कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

लोणी:-भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील ग्राऊंडवर; विकासकामांचा घेतला आढावा.

पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील ग्राऊंडवर; विकासकामांचा घेतला आढावा.

लोणी व कोल्हार येथे विकासकामांची पाहणी करत जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी.

लोणी/कोल्हार | प्रतिनिधी
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोल्हार–नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून कामाचा दर्जा, वाहतुकीची सुविधा आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

लोणी खुर्दयेथे सुरू असलेल्या महामार्गाचे व गटर बांधकामाचीही त्यांनी ग्रामस्थांसोबत पाहणी केली. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरविला. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या. प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित विभागांशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तात्काळ सूचना दिल्या.

त्यानंतर कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचीही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. तसेच कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्या.

भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकासकामांचा आढावा घेणे, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणे आणि कामांच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणे, यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button