वाई:-बावनकुळे-कवाडे बैठक; वाई तहसीलदारांवर कारवाईची मागणी!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईच्या तहसीलदार मेटकरी व पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्यावर कारवाई करिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष , राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांची महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत बैठक संपन्न.

दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी वाई तहसीलदार मेटकरी व पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्यावर कारवाईसाठी महसूल मंत्र्यां सोबत , राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक.
महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना कारवाईचे निर्देश.
वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती तथा पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्याबाबत विविध तक्रारी आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर दुपारी संबंधित विषयांवरती बैठक घेण्यात आली. वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांची कार्यशैली, अतिक्रमण करून बांधलेला बंगला , आणि संपत्ती याची सविस्तर माहिती महसूल मंत्र्यांसमोर मांडण्यात आली. संबंधित अधिकारी दाम्पत्याच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयदीप भाई कवाडे यांनी केली.
या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
वाई तालुक्यात प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता व जनतेला न्याय मिळणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका पीपल्स रिपब्लिकन पार्टीने व्यक्त केली आहे.
या बैठकीमुळे वाई तालुक्यातील संबंधित प्रकरणांवर आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सदर बैठकीस पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे, जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुकाध्यक्ष विजय भाऊ सातपुते, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अमोल चव्हाण, सचिन अंबिके उपस्थित होते.





