नागठाणे:-कृषी संजीवनी महिला शेतकरी गटाकडून नागठाणे येथे सोयाबीन बियाण्यांची खरेदी; खरीप हंगामाच्या तयारीला वेग.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे:-कृषी संजीवनी महिला शेतकरी गटाकडून नागठाणे येथे सोयाबीन बियाण्यांची खरेदी; खरीप हंगामाच्या तयारीला वेग.

सातारा :-नागठाणे येथे पाणी फाउंडेशन च्या “उमेद शीतीज नवे, विश्वास नवा”या उपक्रमांतर्गत कृष्णवि ग्रामसंघ नागठाणे अंतर्गत कार्यरत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी संजीवनी महिला शेतकरी गटाच्या वतीने सोयाबीन बियाण्यांची खरेदी करण्यात आली. यावेळी गटातील महिला शेतकऱ्यांनी एकत्रितपणे दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची निवड करून आगामी पेरणीसाठी तयारी सुरू केली.
महिला शेतकरी गटाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे योग्य दरात उपलब्ध होण्यास मदत झाली असून सामूहिक खरेदीमुळे खर्चातही बचत होणार आहे. कृषी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग आणि आधुनिक शेती पद्धतींचा स्वीकार यामुळे शेती अधिक सक्षम व उत्पादनक्षम करण्यास हातभार लागणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सदर बियाण्याची खरेदी श्री चौंडेश्वरी ऍग्रो एजन्सी नागठाणे येथून करण्यात आली,यावेळी पंचायत समिती सदस्य श्री संतोष साळुंखे पाटिल यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्याची निवड, आधुनिक शेती पध्दती, योग्य पेरणी, पीक उत्पन्नवाढीसाठी आवश्यक बाबीबाबत मार्गदर्शन केले गटातील सर्व महिला सदस्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. कृषी संजीवनी महिला शेतकरी गटाचा हा उपक्रम इतर शेतकरी गटांसाठीही प्रेरणादायी ठरत असून सामूहिक शेती व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण करत आहे.




