मुंबई:-सत्य मांडणाऱ्या निर्भीड लेखणीचा होणार जागर; मुंबईत रंगणार ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा..!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-सत्य मांडणाऱ्या निर्भीड लेखणीचा होणार जागर; मुंबईत रंगणार ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा..!

मुंबई
“समाजाचा आरसा असणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची बाजू मांडणाऱ्या तळागाळातील पत्रकारांच्या, समाजसेवकांच्या आणि कलावंतांच्या अविरत कष्टांचा सन्मान आता मुंबईत होणार आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून, ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ तर्फे रविवार, दिनांक १२ जुलै रोजी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबतच ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक-पाक्षिकांचे प्रतिनिधी आणि डिजिटल न्यूज पोर्टलच्या संपादकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा हा कौतुकास्पद सोहळा ठरणार आहे. या सोहळ्यात पत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लढवय्या लेखणीचा सन्मान करण्यासाठी विविध मानाचे पुरस्कार प्रदान केले जातील. त्यात प्रामुख्याने ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’, ‘कलम-रत्न’, ‘कलागौरव’, ‘साहित्य-संस्कृती जीवनगौरव’, ‘विवेक-दीप’, ‘जनसेवा रक्षक’ आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्याला कला, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार आणि जादूगार श्री.श्रीधर कीर, “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम प्रा.विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक श्री.अरुण म्हात्रे, साहित्याचार्य आणि ज्येष्ठ संपादक श्री. पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार श्री.गुरुनाथ तिरपणकर, श्री.अड.सुनिल शिर्के आणि समाजसेवक श्री. कृष्णा बाळू काजरोळकर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
“लेखणीच्या या पवित्र उत्सवाचा हा दिमाखदार सोहळा रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी, सकाळी ठीक ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत, सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) येथे संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याला रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पत्रकार राहुल खरात आणि केतन भोज यांनी आयोजकांतर्फे केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



