मायणी:-रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मराठा समाजास मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही – मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मराठा समाजास मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही – मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील.

मायणी प्रतिनिधी—
— (फोटो – मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करताना खटाव – माण – फलटण तालुक्यांच्या वतीने सत्कार करताना सकल मराठा सेवक) रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मराठा समाजाला मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मायणी येथील कै. शंकरराव पाटील बहु उद्देशीय सभागृहात खटाव – माण – फलटण तालुक्यातून आलेल्या मराठा कार्यकर्त्यासमोर भव्य सभेत बोलताना व्यक्त केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा तिन्ही तालुक्यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरज पाटील,संदिप मांडवे,डॉ.विकास देशमुख,अरुण काकडे,विलास सोमदे, कृष्णा सोमदे, दिपक कणसे, रामभाऊ सोमदे,हेमंत जाधव ,रणजीत माने ,सरपंच सौ.सोनाली माने,स्वप्नील घाडगे,हिम्मतराव देशमुख आदि उपस्थित होते.ऍड. सुरज पाटील यांनी कार्यक्रमासाठी मोफत हॉल दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्ही तालुक्यातून आलेल्या अनेक मराठा सेवकांनी मनोगते व्यक्त केली.मनोज जरांगे पाटील मराठा समाजास न्याय मिळण्यासाठी जिवाचे रान करत आहेत याबद्दल त्यांना मनोगतातून धन्यवाद दिले. मायणी येथील चांदणी चौकात मनोज जरांगे पाटील आल्यानंतर त्यांच्यावर जेसीबी वरुन पुष्पवृष्टी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. जरांगे पाटील म्हणाले,मराठा समाजाची परिस्थिती हलाखीची आहे.या समाजातील मुलांना शिक्षणासाठी पैसे मिळत नाहीत. मी मराठा समाजाची एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही. मराठा समाज शांत बसल्यामुळे समाजाचे वाटोळे होत आहे.आरक्षणासाठी आपण जीव पणाला लावू पण मागे हटणार नाही. प.महाराष्ट्रात एवढा मोठा उठाव झाल्याचे मी आजपर्यंत पाहिले नाही. मराठा समाजाचे प्रमाणपत्र जाणून बुजून रद्द केले जात आहे,हे योग्य नाही असे ते म्हणाले. –





