कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली:-कडेगावात ‘श्री मातोश्री ज्वेलर्स’चा शुभारंभ उत्साहात संपन्न.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कडेगावात ‘श्री मातोश्री ज्वेलर्स’चा शुभारंभ उत्साहात संपन्न.

कडेगाव:-कडेगाव शहराच्या व्यापारी क्षेत्रात विश्वास, गुणवत्ता आणि शुद्धतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या ‘श्री मातोश्री ज्वेलर्स’ या अत्याधुनिक सुवर्ण-रौप्य दालनाचा शुभारंभ नुकताच भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कडेगाव बसस्थानकाजवळ, मायाक्का मंदिरामागे असलेल्या या नव्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी परिसरातील नागरिक, व्यापारी, सुवर्णप्रेमी ग्राहक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धायगुडे परिवारास शुभेच्छांचा वर्षाव केला.
या मंगल सोहळ्यास श्री विठ्ठल स्वामी महाराज (वडगाव ज. स्वा.), ह.भ.प.भाऊसो महाराज (निमसोड) तसेच ह.भ.प.प्रकाश महाराज लोकरे (चोराडे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी व्यवसायात प्रामाणिकपणा, ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तापूर्ण सेवा यांचे महत्त्व अधोरेखित करत घार्गे परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.

श्री मातोश्री ज्वेलर्स येथे ९१.६ हॉलमार्क सोन्याचे दागिने, आकर्षक चांदीचे दागिने, पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स तसेच ग्राहकांच्या आवडीनुसार ऑर्डरप्रमाणे दागिने तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दर्जेदार उत्पादने, योग्य दर आणि विश्वासार्ह सेवा या त्रिसूत्रीवर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.
यावेळी प्रोप्रायटर संजय घार्गे व प्रवीण घार्गे यांनी उपस्थित सर्व संत-महंत, मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले. ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून, दर्जेदार सेवा देत हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नव्या दालनाच्या शुभारंभामुळे कडेगाव शहरातील सुवर्ण-रौप्य दागिन्यांच्या क्षेत्रात आणखी एका विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख प्रतिष्ठानाची भर पडली असून, उपस्थितांनी ‘श्री मातोश्री ज्वेलर्स’ च्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button