आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर/ पोलादपूर:-आंबेनळी घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित; अर्धवट कामांमुळे अपघाताचे सावट.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आंबेनळी घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित; अर्धवट कामांमुळे अपघाताचे सावट.

महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ‘अंबेनळी घाटात’ सध्या सुरू असलेल्या मृत्यूच्या साखळीने जनसामान्य माणसात प्रवास करणे भीतीदायक झाले आहे. आंबेनळी घाटात सतत होत असलेल्या अपघातांमुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करणे भितीदायक ठरत आहे. आंबेनळी घाटात वारंवार होत असलेल्या अपघातांकडे शासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाई शिरूर सातारा इकडच्या रस्त्यांची आढावा बैठक मंत्रालयात घेतली जाते. परंतु आंबेनळी घाटात सतत होत असलेल्या अपघातांच्या बाबतीत आढावा बैठक का घेतली जात नाही असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

काल महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले असून कुंभरोशी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटातील तब्बल ८०० ते १००० फूट खोल दरीत एक स्कॉर्पिओ वाहन कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहनात एकूण आठ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाला जवळपास 24 तास होत आले तरी हाती अजून काही मृतदेह सापडलेले नाहीत. यावरून आपल्या लक्षात येईल की घाट किती खोल दर्यांमध्ये विखुरलेला आहे.

या गोष्टीचा सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येईल की रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील काही ठिकाणी रस्ता खणून ठेवला असून, कामाचा वेग संथ असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून घाटात ठिकठिकाणी संरक्षक भिंती आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी संरक्षण कठडे (Guardrails) काढण्यात आले असून त्या जागी कोणतीही तात्पुरती सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. तीव्र वळणांवर रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहने थेट दरीत कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. धूळ आणि निसरडा रस्ता कामासाठी वापरले जाणारे खडी आणि मातीचे ढीग रस्त्यावरच असल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, उडणाऱ्या धुळीमुळे समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत जतन झाले आहे.

अंबेनळी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मुख्य मार्ग आहे. येथे नेहमीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अंबेनळी घाटासारख्या संवेदनशील भागात पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात डोंगराची माती मऊ होते. जर खोदकाम अर्धवट असेल किंवा संरक्षक भिंतीचे (Retaining Wall) काम पूर्ण नसेल, तर पावसाच्या पाण्यामुळे दरडी कोसळून रस्ता पूर्णपणे बंद होऊ शकतो. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. घाटात सध्या पडलेली खडी, माती आणि अर्धवट रस्ता पावसामुळे चिखलमय होतो. घाटातील तीव्र वळणांवर वाहने घसरण्याचे (Skidding) प्रमाण वाढते, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन दरीत जाण्याचा धोका निर्माण होतो. अंबेनळी घाटात पावसाळ्यात प्रचंड धुके असते. जर रस्त्याचे काम सुरू असेल आणि तिथे योग्य ‘रिफ्लेक्टर’ किंवा ‘बॅरिकेड्स’ नसतील, तर धुुक्यामुळे चालकाला समोरचा रस्ता किंवा दरीचा अंदाज येत नाही. ड्रेनेज किंवा मोऱ्यांचे (Culverts) काम पूर्ण झाले नसेल, तर पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे नवीन केलेला रस्ता उखडला जातो आणि प्रशासनाचा पैसा व कष्ट वाया जातात. तसेच रस्त्यावर मोठे खड्डे पडून वाहतूक संथ होते.

या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने ‘बी.एम. आणि ए.सी.’ (Bituminous Macadam) पद्धतीचा वापर करून पाण्याचा निचरा होईल अशा दर्जाचे रस्ते बनवणे आवश्यक आहे. घाट रस्ता असल्याने जिथे दरडी कोसळण्याची शक्यता आहे किंवा जिथे खोल दरी आहे, तिथे सिमेंटच्या संरक्षक भिंती किंवा ‘क्रॅश बॅरियर्स’ बसवणे अनिवार्य आहे. रस्त्यांच्या कडेला पक्की गटारे बांधणे, जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावर साचून खड्डे पडणार नाहीत. ज्या ठिकाणी कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले आहे, तिथे ‘पेव्हर ब्लॉक’ किंवा तातडीचा खडीकरण थर टाकून रस्ता समतल करणे. रात्रीच्या वेळी धुक्यातून प्रवास करताना अडचण येऊ नये म्हणून मुख्य वळणांवर सौर पथदिवे बसवणे.

प्रशासनाने हे काम पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करावे. आणि कंत्राटदाराने जास्तीत जास्त कामगारांमार्फत पावसाळ्यापूर्वी खडीकरण आणि डांबरीकरण पूर्ण करणे. संरक्षण कठडे बसवणे: जिथे काम सुरू आहे तिथे तातडीने सिमेंटचे किंवा स्टीलचे मजबूत कठडे बसवणे. सूचना फलक: “काम सुरू आहे”, “पुढील रस्ता अरुंद आहे” असे मोठे रेडियम फलक लावणे अनिवार्य आहे.

याबाबतीत मागील दोन-तीन महिने पासून मी वारंवार मीडिया मार्फत, दैनिक पेपर मार्फत बातम्या देऊ केल्या परंतु त्यांना ते प्रसारित करणे कदाचित शक्य झाले नसेल.

असो माणसांचा जीव गेल्यानंतर त्यांना मदत देणे ऐवजी त्यांचा मृत्यूपासून बचाव करण्याकरिता वेळेत घाट रस्त्याची दुरुस्ती केली, डागडुजी जी केली तर केव्हाही सोयीस्कर होईल. निदान मृतात्म्यांच्या घरच्यांची हाय हाय तरी लागणार नाही.

अनंत शंकर जाधव
मुंबई

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button