ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई:-कोकण विभागीय माहिती कार्यालयाला मिळाले नवे उपसंचालक – संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नवी मुंबई:-कोकण विभागीय माहिती कार्यालयाला मिळाले नवे उपसंचालक – संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार.

नवी मुंबई दि.14 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालकांच्या दालनात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमात हा पदभार सोहळा संपन्न झाला. आतापर्यंत या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत आज नवनियुक्त उपसंचालक श्री. चव्हाण यांच्याकडे या पदाची अधिकृत सूत्रे सुपूर्द केली आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या सोहळ्याप्रसंगी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल माध्यमातून म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button