सातारा:-कृषी संजीवनी महिला बचत गटाच्या फॉर्मर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची शेतीला सदिच्छा भेट.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-कृषी संजीवनी महिला बचत गटाच्या फॉर्मर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची शेतीला सदिच्छा भेट.

सातारा:-कृषी संजीवनी महिला बचत गट, नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फॉर्मर कप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील यांनी नागठाणे गावचे सुपुत्र श्री. चंद्रकांत महाडिक यांच्या शेतीला सदिच्छा भेट दिली
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती पद्धती, यांत्रिकीकरण व कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कृषी संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शेतीविषयक जनजागृती, महिला सक्षमीकरण तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतीला भेट देऊन शेतकऱ्यांना दिलेला हा सन्मान व प्रोत्साहनपर संदेश सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
या प्रसंगी कृषी आयुक्त भाग्यश्री फरांदे मॅडम सातारा तालुका कृषी अधिकारी श्री. जयदीप ढगे साहेब, नागठाणे गावचे मंडल कृषी अधिकारी श्री.अजय पवार साहेब, मंडल कृषी सहाय्यक तीटकरे साहेब नागठाणे गणाचे पंचायत समिती सदस्य श्री.संतोष साळुंखे पाटील कृषी भुषण श्री. मनोहर साळुंखे भाऊ, विकास सोसायटीचे चेअरमन श्री.मारुती जेधे सर, व्हा.चेअरमन श्री संतोष साळुंखे तसेच महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




