खटाव:-श्री धनाजीराव पवार यांची पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री धनाजीराव पवार यांची पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती.

खटाव :- सातारा जिल्ह्यातील खटाव पंचायत समितीचे केंद्रप्रमुख श्री धनाजीराव पवार यांची महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्रच्या पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अभ्यासू, धडपड्या आणि संघटनात्मक बांधिलकी असलेल्या कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. तसेच अधिकाधिक केंद्रप्रमुखांना महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्रशी जोडून संघटनेचे बळ वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे विभागातील केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, तसेच संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*”एकतेतून उभे राहते संघटनेचे बळ,कर्तृत्वाने उजळते कार्याचे नवे पाऊल.”‘
श्री धनाजीराव पवार यांच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!




