आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-लाहोटी कन्या प्रशालेत उत्साहात ‘कालिदास दिन’ साजरा.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लाहोटी कन्या प्रशालेत उत्साहात ‘कालिदास दिन’ साजरा.

कराड :- शिक्षण मंडळ, कराड संचलित स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये आषाढाच्या पहिल्या दिवशी अर्थात बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी ‘कालिदास दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्कृत भाषा, साहित्य आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचा वारसा विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमासाठी ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर येथील संस्कृत विषयाच्या शिक्षिका सुनंदा शिवाजीराव पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महाकवी कालिदास यांचे जीवन, साहित्यसंपदा, संस्कृत भाषेचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील त्यांच्या अजरामर योगदानाविषयी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांनी केले. कालिदास दिन हा प्रशालेतील शैक्षणिक वर्षातील पहिला महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचे सांगत त्यांनी प्रशालेच्या शैक्षणिक यशाचा तसेच विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आकर्षक भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशालेच्या संगीत विभागातर्फे संस्कृत गीतांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. संगीत शिक्षिका अदिती फडके व अमृत गिजरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी ‘अ’ आणि नववी ‘अ’च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संस्कृत गीतांनी उपस्थितांना आषाढातील निसर्गसौंदर्याचा मनमोहक अनुभव दिला.
संस्कृत विभाग प्रमुख माधुरी कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कुलकर्णी यांनी केले, तर प्राची नाखरे यांनी आभारप्रदर्शन केले.
या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक सयाजीराव नांगरे, संस्था नियुक्त पर्यवेक्षक जगदीश कुंभार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीची गोडी विद्यार्थिनींमध्ये रुजविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button