आणे-(कराड):-रक्षाविसर्जन निमित्त नातवांकडून वृक्षारोपण; सामाजिक बांधिलकीचा दिला प्रेरणादायी संदेश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आणे-(कराड):-रक्षाविसर्जन निमित्त नातवांकडून वृक्षारोपण; सामाजिक बांधिलकीचा दिला प्रेरणादायी संदेश.

आणे (ता.कराड) :- आणे येथील कै. श्रीमती पार्वती निवृत्ती देसाई यांच्या रक्षाविसर्जन निमित्त त्यांच्या नातवंडांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा तसेच सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला.
कै. पार्वती देसाई यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी आणे येथे रक्षाविसर्जन कार्यक्रम पार पडला. यावेळी पारंपरिक विधींना सामाजिक जाणीवेची जोड देत नातवंडांनी नारळ व आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले.
तुषार देसाई (IPS), राजवर्धन देसाई, शुभम देसाई आणि आर्यन कणसे यांनी हे वृक्षारोपण करत “निसर्ग संवर्धन हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश समाजाला दिला. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
या उपक्रमाचे गावकऱ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. दुःखाच्या प्रसंगातही समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न देसाई परिवाराने केला असून, हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कै. पार्वती देसाई यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे व परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने आणे गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.




