“शिर्डीत उभारणार देशरक्षणाची नवी ताकद ; ‘आत्मनिर्भर भारत’ला मिळणार बळ”
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शिर्डीत उभारणार देशरक्षणाची नवी ताकद ; ‘आत्मनिर्भर भारत’ला मिळणार बळ”

शिर्डी दि.१४ प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलांचे उद्घाटन संरक्षण मंत्री Rajnath Singh यांच्या उपस्थितीत दि.२३ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil आणि Nibe Limited चे गणेश निबे यांनी दिली.
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे संरक्षण उत्पादन संकुल भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टर विकसित होत आहे.
“शिर्डीची भूमी भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे. श्री साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे,” असे स्पष्ट करत कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे तीन हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी शिर्डीची निवड केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
निबे उद्योग समूहाचे गणेश निबे यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून त्यांच्या स्टार्टअपला मोठी संधी मिळाली आहे. शिर्डी येथील प्रकल्पात आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून भविष्यात ही गुंतवणूक आणखी वाढविण्यात येणार आहे.
अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचे डिझाईन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणाऱ्या भारतातील आघाडीच्या निबे ग्रुपच्या शिर्डी प्रकल्पातील बॉम्ब शेल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, लघु व सूक्ष्म उद्योगांचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणीय जबाबदारी या एकात्मिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे सांगून, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते तसेच लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती गणेश निबे यांनी दिली.




