कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-“चक्रीवादळाच्या भोवऱ्यात अडकली स्पीड बोट” धाडसी नाविकाचा दुर्दैवी अंत.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“चक्रीवादळाच्या भोवऱ्यात अडकली स्पीड बोट” धाडसी नाविकाचा दुर्दैवी अंत.

महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी उत्तम भालेराव तापोळा मिनी काश्मीरमध्ये काळाचा घाला; चक्रीवादळात स्पीडबोट उलटली, धाडसी नाविक रुपेश तांबे यांचा दुर्दैवी अंत
महाबळेश्वर तालुक्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा येथील कोयना जलाशयामध्ये सोनावडी-सावडी परिसरात काल सायंकाळी निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले. सुसाट वारे, मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळासारख्या तुफानी वाऱ्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.
याच दरम्यान मुंबईहून पर्यटनासाठी आलेले एक दाम्पत्य स्पीडबोटमधून जलपर्यटनासाठी जलाशयात गेले होते. अचानक आलेल्या तुफानी वादळामुळे स्पीडबोट चक्रीवादळाच्या भवऱ्यात अडकून पलटी झाली. काही क्षणातच आनंदाचा प्रवास मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचला.
हा थरारक प्रकार किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याने वॉटरप्रूफ लाईफ जॅकेट परिधान केल्यामुळे ते पाण्यावर तरंगताना दिसले. स्थानिकांनी तत्काळ दुसऱ्या बोटीच्या साहाय्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढत मानवतेचे दर्शन घडवले.
मात्र स्पीडबोट चालक रुपेश तांबे हा तुफानी भवऱ्यात अडकल्याने त्याला वाचवण्यात यश आले नाही. पोहण्यात अत्यंत तरबेज आणि अनुभवी नाविक म्हणून ओळख असलेल्या रुपेशवर काळाने अचानक झडप घातली.
आज सकाळपासून स्थानिक ग्रामस्थ, बोट क्लबचे सर्व चालक आणि बचाव पथक रुपेश यांचा शोध घेत होते. अखेर दुपारच्या सुमारास जलाशयाच्या किनाऱ्यालगत काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण कोयना कांदाटी-तापोळा विभागावर दुःखाचा डोंगर कोसळला.
रुपेश तांबे यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून, “दुसऱ्यांना जीवनदान देणारा नाविक स्वतः मात्र कोयनाच्या अथांग पाण्यात कायमचा हरपला…” अशा शब्दांत ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तापोळा परिसर आज शोकसागरात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button