श्रीरामपूर:-एकल महिलांच्या हक्कांबाबत पुरवठा विभागाचा असंवेदनशील कारभार – धान्यापासून वंचित महिलांची तहसील कार्यालयात धाव ; अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संताप.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

एकल महिलांच्या हक्कांबाबत पुरवठा विभागाचा असंवेदनशील कारभार – धान्यापासून वंचित महिलांची तहसील कार्यालयात धाव ; अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संताप.

श्रीरामपूर / माळेवाडी (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी)
तालुक्यातील बेलापूर, दत्तनगर, पढेगाव, अशोकनगर व शिरसगाव परिसरातील अनेक एकल महिलांना शिधापत्रिका असूनही धान्य मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात भेट दिली असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला.
गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीत “महिलांची नावे द्या” असे सांगणारे अधिकारी आज मात्र विविध कारणे पुढे करत आपली जबाबदारी झटकताना दिसून आले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनुसूचित जमातीतील काही एकल महिला अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
शिरसगाव येथील अनुसूचित जमातीतील एकल महिला वैशाली सोनवणे यांचे अन्न सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे वर्षभरापूर्वी जमा करून घेण्यास पुरवठा विभागाने नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा मारूनही संबंधित कागदपत्रे स्वीकारण्यात आली नाहीत. परिणामी, शिधापत्रिका असूनही त्या आजपर्यंत धान्याच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.
याचप्रमाणे इतर काही एकल महिलांची नावे व माहिती आज पुरवठा विभागाकडे सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लाभ सुरू करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत महिलांना लाभापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.
या संपूर्ण प्रकाराबाबत मिशन वात्सल्य शासकीय समितीचे अशासकीय सदस्य बाळासाहेब जपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, एकल महिलांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.




