कोल्हापूर:-कणेरी कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या कलाकृतीला न्याय देणारा– मंत्री चंद्रकांत दादा पाटील.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कोल्हापूर:-कणेरी कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या कलाकृतीला न्याय देणारा– मंत्री चंद्रकांत दादा पाटील.

(अजित जगताप)
कोल्हापूर दि: अध्यात्मिक वारसा लाभलेल्या
श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१ मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले . कनेरी मठ कारागीर महा कुंभ हजारो महिलांच्या कलाकुटीला न्याय देणारा ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. य पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, आ. राजेश क्षीरसागर, माजी आ. प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे, डॉ. वर्षा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते.
कणेरी मठातील सिद्धगिरी या कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला व कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करण्यासाठी खूप मोठे व्यासपीठ निर्माण केलेले आहे. या उत्सवात उच्च व तंत्र शिक्षणातील सर्व महाविद्यालयांना हा उत्सव पाहण्यासाठी आणि या उत्सवात सादरीकरण करण्यासाठी तंत्र व उच्च शिक्षण विभागातील सर्वजण उपस्थित आहेत. हा महाकुंभ पहायला येणारे विद्यार्थी व लोकांच्या जीवनात स्टार्टअपची संकल्पना निश्चित उतरले . महिला वर्गाला वेळेच्या कमतरतेमुळे त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागते, त्यामुळे या कारागिरी महाकुंभाची फलनिष्पती म्हणून भविष्यात हजारो महिलांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत हस्तकला व विविध विकसित कलेमुळे अभिनव कामकाज मिळेल असाही विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला .
यावेळी प्रकाश आवडे यांनी या उत्सवाला दररोज इचलकरंजी शहरातून पाचशे महिलांना या कारागिरी महाकुंभासाठी आणण्याची व्यावस्था करणार असल्याचे सांगितले . शिवसेना कोल्हापूर यांच्या वतीने हि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहर, भुदरगड, वारणा, मुरगूड आदी ठिकाणावरून मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात असल्याचे आ. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
भारतातील १७ राज्या-राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक कलाकार व त्यांच्या कला आणि हस्तकला यांचे सुमारे २०० स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. मेघालय, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा , गुजरात व पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातून आलेल्या कलाकारांचे कसब आणि कौशल्य प्रदर्शन व विक्री पाहण्यास मिळत आहे. काही महिला कलावंत या प्रात्यक्षिक दाखवून कलेच्या रूपातून वस्तू निर्मिती करत आहे. तसेच या वस्तूंची विक्री ही या ठिकाणी उपलब्ध आहे.
टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील.
या कार्यक्रमात तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींनी या कारागीर महाकुंभात सहभाग घेतला आहे. यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ, आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय,डीकेटीई इचलकरंजी, अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तळसंदे , बापुजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालय,यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना स्टार्टअप करिता दहा लाखाचे अर्थसहाय्य करण्याची व्यवस्था हि करण्यात आल्याचे सांगितले.
या सिद्धगिरी कारागिर महाकुंभ उद्घाटन सोहळ्यात प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालानयचे उपसंचालक भरत लांगे, शशिकांत पुजारी, शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, राहुल चिकोडे, गुंडोपंत वद्द, विक्रम पाटील, एकत्वं इन्फ्राचे प्रबुद्ध परदेशी यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा महाकुंभ चार एप्रिल पर्यंत चालणार असून नागरिकांनी या कारागिर महाकुंभास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. यावेळी कणेरी मठातून श्री. महाराज यांची मूर्ती व पालखी तसेच श्री. हनुमान देवाची मूर्ती यांचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी महिलावर्गाने श्रीच्या प्रतिमेच्या औक्षण केले. सदरचा कारागीर महाकुंभ पाहण्यासाठी बोटे गर्दी झालेली आहे. लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल होत असल्याने या महाकुंभ मेळाव्याने खऱ्या अर्थाने माता-भगिनींच्या संसाराला हातभार लावणारी आर्थिक क्रांती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. या महा कुंभ मेळाव्यासाठी बेळगाव ,निपाणी, धारवाड, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, पुणे, कोकण भागातून पर्यटक भेट देत आहेत.
2) खटाव:-निमसोड गटात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने श्री मांडवे यांचा कार्य शुभारंभ..

(अजित जगताप)
निमसोड दि: राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या खटाव तालुक्यामध्ये निमसोड जिल्हा परिषद गटामध्ये संदीप मांडवे यांनी विजयी संपादन केला. पहिले काम त्यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने सुरू केल्याने स्थानिकांची गैरसोय दूर झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खोटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे व अनिल देसाई यांना खोट्या अपहरण गुन्ह्यामध्ये अडकवले. सातारा पोलिसांनी त्यांना हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले होते. या घटनेची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांच्या कर्तबगारीला चांगलीच झालर आलेले आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आता त्यांच्याकडे पाहिले जात आहे. खटाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे . त्यामुळे मतदारांनी त्यांना मतदान केले होते. पक्षाच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबवणार नेते अशी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोड येथे जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा श्री मांडवे यांच्या हस्ते करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
.यावेळी निमसोडचे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव देशमुख , माजी सरपंच दिगंबर देशमुख, विलास घाडगे, पोपट घाडगे ,निलेश घाडगे, विजय देशमुख, धनाजी देशमुख, कृष्णराज देशमुख ,सुशांत देशमुख ,राजेंद्र कुंभार, लालासो देशमुख, प्रमोद देशमुख , तसेच मोहन शेठ घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य पुस्तके व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होता.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा गतिमान करण्यासाठी नेहमीच निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयत्न केले जातात. लोकांना वेळेवर व चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. नवीन रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची सोय झालेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होऊन अनेकांचे प्राण वाचणार आहे.
._________________________________
महत्वपूर्ण चौकट—
जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला घडलेल्या नाट्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णवाहिका गाजली होती. वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे व अनिल देसाई यांना पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आले होते. आज सन्मानाने निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य श्री संदीप मांडवे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान के घर में देर है मगर अंधेर नही. याची चुणूक पाहण्यास मिळाली आहे.




