श्रीरामपूर:-“भोंदूगिरीचा मुखवटा फाडणाऱ्या निर्भीड पत्रकाराचा सन्मान — श्रद्धेच्या नावावरच्या फसवणुकीला जोरदार चपराक!”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“भोंदूगिरीचा मुखवटा फाडणाऱ्या निर्भीड पत्रकाराचा सन्मान — श्रद्धेच्या नावावरच्या फसवणुकीला जोरदार चपराक!”

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपूर | प्रतिनिधी
नाशिक येथे भोंदूगिरी करून जनतेची फसवणूक करणाऱ्या कॅप्टन अशोक थोरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम करणारे खबरदार पुढारीचे संपादक व निर्भीड पत्रकार दत्तात्रय खेमनर यांचा श्रीरामपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे सत्कार करण्यात आला.
मागील वर्षी खेमनर यांनी या भोंदू बाबाच्या कारवायांचा भांडाफोड करत जनतेसमोर सत्य आणले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एका पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी कॅप्टन थोरात याला अटक केली. या घटनेनंतर त्याचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
देवधर्माच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणाऱ्या तसेच महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूला अटक होणे ही मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणाला प्रथम वाचा फोडल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांच्या हस्ते खेमनर यांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अंनिसचे तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष शाहीर भीमराव कदम, कायदा विभाग प्रमुख ॲड. अण्णासाहेब मोहन, बुवाबाजी संघर्ष विभाग प्रमुख सुभाष बोधक, संतोष त्रिभुवन, अमोल सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जय महाराष्ट्र मराठी न्यूजचे प्रतिनिधी जयेश सावंत यांचाही जादूटोणाविरोधी कायद्याच्या पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी समाजात वाढत चाललेल्या बुवाबाजीमुळे होणारे आर्थिक, मानसिक आणि विशेषतः महिलांचे लैंगिक शोषण या गंभीर विषयावर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्रात तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अशा भोंदू बाबांचे वाढते जाळे चिंतेचा विषय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रसारमाध्यमांनी अंनिसला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती व उदाहरणे मांडत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
तसेच महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष विवेक गिरमे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, जिल्हा सल्लागार सुभाषराव गायकवाड व तालुका अध्यक्ष चंद्रकांत झुरंगे यांची नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
📌 निष्कर्ष:
भोंदूगिरीविरोधात उभा राहणारा आवाज अधिक बुलंद होत असून, समाजाला जागरूक करण्यासाठी पत्रकारिता आणि सामाजिक संघटनांची एकजूट हीच काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.




