नागठाणे:-(सातारा):-“शेतकऱ्यांच्या समृद्धीकडे मोठं पाऊल – नागठाणेत नरेगा अंतर्गत जवाहर विहिरींचा शुभारंभ!”
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शेतकऱ्यांच्या समृद्धीकडे मोठं पाऊल – नागठाणेत नरेगा अंतर्गत जवाहर विहिरींचा शुभारंभ!”

तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा :- महाराष्ट्र शासनाच्या पंचायत समिती सातारा यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नरेगा योजनेअंतर्गत जवाहर विहिरींच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या शुभप्रसंगी नागठाणे गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच स्वामी समर्थ आध्यात्मिक परिवाराचे प्रमुख श्री. विश्वास भोसले (दादा) यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. हणमंत साळुंखे (तात्या), माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. धनाजी साळुंखे (आबा), ज्येष्ठ नागरिक व प्रगतशील बागायतदार श्री. हनुमंत साळुंखे (अण्णा), नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन श्री. गोरख यादव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पाण्याची सोय सुधारून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




