महाबळेश्वर:-प्रशासकीय निष्क्रियतेचे ग्रहण सुटणार! कळमगाव-मुरा येथील पाणीप्रश्नावर नवनिर्वाचित उपसभापतींकडून ‘ॲक्शन मोड’मध्ये निर्णय.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर:-प्रशासकीय निष्क्रियतेचे ग्रहण सुटणार! कळमगाव-मुरा येथील पाणीप्रश्नावर नवनिर्वाचित उपसभापतींकडून ‘ॲक्शन मोड’मध्ये निर्णय.

महाबळेश्वर (प्रतिनिधी): उत्तम भालेराव सोशल मीडिया प्रमुख महाबळेश्वर .
गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांची गाजरं खाणाऱ्या प्रशासनाला अखेर नवनिर्वाचित उपसभापतींनी दणका दिला आहे. महाबळेश्वर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान होताच संजय मोरे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कामाची तडाखेबंद सुरुवात केली असून, कळमगाव-मुरा येथील बौद्ध वस्तीतील गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अवघ्या ४८ तासांत (दोन दिवसांत) तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.
वर्षानुवर्षांचा वनवास संपणार?
कळमगाव-मुरा परिसरातील ग्रामस्थ, विशेषतः बौद्ध वस्तीतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून वनवास भोगत होते. वारंवार तक्रारी करूनही ढिम्म प्रशासन याकडे डोळेझाक करत होते. मात्र, काल पंचायत समितीमध्ये झालेल्या पहिल्याच बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. यावर अत्यंत कडक भूमिका घेत उपसभापती संजय मोरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि “जनतेची कामे अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
राजकीय नेत्यांची एकजूट, प्रशासनाला धारेवर धरले!
यावेळी केवळ शब्दांचा बुडबुडा न काढता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख उत्तम शेठ भालेराव आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. “सामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे,” अशा जहाल शब्दांत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कान टोचले.
गावागावात आनंदाचे वातावरण
दोन दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने कळमगाव आणि देवळी परिसरातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे. यावेळी सभापती सौ. शकुंतला चोरमुले, सदस्य सौ. वंदना भिलारे, संजय शेलार यांसह देवळीचे दीपक दादा जाधव, कळमगावचे सरपंच अनिल हिरवे, पोलीस पाटील बाबू कदम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
”सामान्य माणसाने कामासाठी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवायच्या नाहीत, तर प्रशासनाने जनतेच्या दारात जाऊन सेवा द्यायची आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”
— संजय मोरे, उपसभापती, महाबळेश्वर पंचायत समिती.




