आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड पंचायत समितीवर भाजपचा ‘ऐतिहासिक’ कब्जा; नंदाताई यादव सभापती, अनिता वेताळ उपसभापती!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड पंचायत समितीवर भाजपचा ‘ऐतिहासिक’ कब्जा; नंदाताई यादव सभापती, अनिता वेताळ उपसभापती!

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

पहिल्यांदाच कमळ फुललं; विरोधकांना धक्का, कार्यकर्त्यांचा जल्लोष.

कराड, दि. १८ : कराड तालुक्याच्या राजकीय पटावर आज मोठा उलटफेर घडला असून पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच सत्ता काबीज करत ‘ऐतिहासिक’ झेंडा रोवला आहे. सभापतीपदी नंदाताई अरुण यादव तर उपसभापतीपदी अनिता सतीश वेताळ यांची बहुमताने निवड होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात परिसर दणाणून सोडला.
सभापती निवडणुकीत नंदाताई यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या स्वाती थोरात यांचा ३ मतांनी पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केले. तर उपसभापतीपदी अनिता वेताळ यांनी काँग्रेसचे रवींद्र बडेकर यांच्यावर २ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
या दणदणीत विजयानंतर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर ‘भाजपमय’ झाला होता.
“ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी समर्पित राहील. ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाला गती देणे हेच आमचे ध्येय आहे,” अशी ग्वाही नूतन सभापती नंदाताई यादव व उपसभापती अनिता वेताळ यांनी दिली.
विजयानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रीतिसंगम येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.
ही निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच कमळ फुलल्याने आता तालुक्यातील विकासाला नवी दिशा मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

2) कराड:-“सिबील स्कोअर दुरुस्त करा, नाहीतर उपोषण!” — शिवराष्ट्र युवक संघटना आक्रमक
२३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा; महिलांवरील अन्यायाविरोधात लढा.

कराड, दि. १८ : कोरोना काळात घेतलेली कर्जे व्याजासह पूर्ण फेडूनही महिलांचे सिबील स्कोअर अद्याप ‘थकीत’ दाखवले जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रश्नावर शिवराष्ट्र युवक संघटना, महाराष्ट्रने आक्रमक पवित्रा घेत थेट प्रशासनालाच इशारा दिला आहे.
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेने स्पष्ट केले आहे की, अनेक महिला कर्जदार व जामीनदारांनी कोरोना काळातील आर्थिक अडचणींवर मात करत कर्जाची संपूर्ण परतफेड केली आहे. मात्र, बँका व फायनान्स कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या सिबील स्कोअरमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.
याचा थेट फटका महिलांच्या भविष्यातील संधींवर बसत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ‘मुद्रा लोन’ तसेच ‘जिल्हा उद्योग केंद्र’ योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला उद्योजिकांना खराब सिबील स्कोअरमुळे कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या घोषणांना हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे.
“प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बँका आणि फायनान्स कंपन्यांना सिबील स्कोअर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा २३ मार्च २०२६ पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी दिला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपाध्यक्ष सदाशिव सोनतळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा दिपालीताई शिंदे, सरचिटणीस शोभाताई सुतार, जिल्हा सचिव सुनिता भोसले, सुनिता जाधव (उपाध्यक्षा, माण-खटाव), छाया कुंभार, रुपाली कोळी, लक्ष्मी कोकरे, सुचित्रा कुडाळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button