क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-“महाराष्ट्र जबरदस्ती धर्मांतराला लगाम; महाराष्ट्रात कठोर कायदा मंजूर!”जबरदस्तीला आता थारा नाही.

पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय  अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“महाराष्ट्र जबरदस्ती धर्मांतराला लगाम; महाराष्ट्रात कठोर कायदा मंजूर!”जबरदस्तीला आता थारा नाही.

 हवेली प्रतिनिधी प्रमोद काळे

महाराष्ट्रात जबरदस्ती, फसवणूक आणि प्रलोभन देऊन होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदा मंजूर करत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नवीन कायद्यानुसार, जबरदस्तीने किंवा दबाव टाकून धर्मांतर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार आहे. अशा प्रकरणांमध्ये ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, धर्मांतर करण्यापूर्वी प्रशासनाला पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक पालकांनी विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. “फसवणूक किंवा प्रलोभन देऊन आमच्या मुलींना लक्ष्य केलं जातं,” अशी भावना काही पालकांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा कायदा मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, हा कायदा नागरिकांच्या धर्मस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी असून जबरदस्तीच्या प्रकारांना थांबवणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र, विरोधकांनी या निर्णयावर टीका करत हा कायदा “धर्मस्वातंत्र्यावर बंधने आणणारा” असल्याचा आरोप केला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button