पारनेर:-अहिल्यानगर हादरलं कीर्तनकारकडून अल्पवयीन मुलीवर ५ वर्षे अत्याचार , पारनेमध्ये ‘ Pocso ‘ अंतर्गत गुन्हा ‘ आरोपी अटकेत.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-अहिल्यानगर हादरलं कीर्तनकारकडून अल्पवयीन मुलीवर ५ वर्षे अत्याचार , पारनेमध्ये ‘ Pocso ‘ अंतर्गत गुन्हा ‘ आरोपी अटकेत.

श्रीरामपुर /माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रातिनिधी ) वारकरी परंपरकेला काळिमा फासणारी संतापजनक घटना जिल्ह्यांतील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या नाराधामाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ०५ वर्षे धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे . एवढंच नव्हे तर नराधम आरोपीने मुलीला गरम लोखंडी पकडीने चटके देत आ मानुष मारहाण केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
पीडित मुलगी इयत्ता ८वीत शिकत असतानाच हा प्रकार सुरु होता . आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असल्यानं दोन्ही कुटुंबांमध्ये कौटुंबिक संबंध होते . पीडिचेचा भाऊ आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत असल्याचा फायदा घेत आरोपीने २०२१ पासून पीडित मुलीवर वाईट नजर ठेवली मुलगी घरी एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचं समोर आलं असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली . मी दोन हाफ मर्डर केले आहेत जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आई – वडिलांना आणि भावाला मारून टाकीन अशी भीती दाखवली .
कुटुंबाला काही होऊ नये म्हणून पीडितेला हा छळ अनेक वर्ष गुपचुप सहन करावा लागला दरम्यात ‘ १० मार्च २०२6 रोजी या अत्याचाराचा कळस गाठला . आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या घरी बोलावलं तिने येण्यात नकार दिला असता कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली . भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबु व चापट्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी पकड गैसवर तापवून तिच्या शरीरावर चटके देत अमानुष अत्याचार केला या क्रुर मारहाणीमुळे पीडितेला चालणंही कठीण झालं होतं.दि. १४ मार्च २०२६ रोजी तिचा भाऊ घरी आल्यानंतर तिची गंभीर अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतलं . त्यानंतर मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याधाराचा सर्व कहाणी सांगितली . मग पीडिजेच्या भावाने थेट पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्यात दाखल केली . पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लौंकिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे . किर्तनकार सारख्या व्यक्तीने असे काळे कृत्य केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.



