आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिर्डी:-गॅस ठंचाईचा फटका ! साई संस्थानच्या प्रसादालयातील पदार्थांमध्ये तात्पुरता बदल लाडु प्रसादात देखील बदल.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गॅस ठंचाईचा फटका ! साई संस्थानच्या प्रसादालयातील पदार्थांमध्ये तात्पुरता बदल लाडु प्रसादात देखील बदल.

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
अमेरिका इराण – इस्रायल यांच्यातील संघर्षामुळं एलपीजी गॅसच्या पुरवण्याबाबत चिंता वाढत असल्यानं शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादाच्या पदार्थामध्ये आणि लाडू वाटपामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) देशात संस्था एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली आहे . त्यांचा परिणाम काही ठिकाणी दिसू लागला आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थाननं दुरदृष्टी दाखवत प्रसादालयातील प्रसाद व्यवस्थेत आणि लाडू प्रसादात तात्पुरता बद्दल करण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे भाविकांना प्रसाद सेवा अखंडितपणे देता यावी आणि उपलब्ध गॅसचा साठा अधिक काळ टिकवता यावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
साईबाबा संस्थान प्रसादाच्या पदार्थांमध्ये बदल !
सध्या शिर्डी साईबाबा संस्थानकडं १० ते १२ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध असल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली पुढील काही दिवसात गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन साईबाबा प्रसादालयातील स्वयंपाक पद्धतील साधेपणा आणण्याचा निर्णय साई संस्थानचं घेतला आहे एरवी साईबाबा प्रसादालयात भाविकांना प्रसाद म्हणून दोन भाज्या ‘ चपाती ‘ वरण – भात आणि गोड पदार्थ दिला जातो . मात्र आता गॅस टंचाईच्या समस्येला सामोरं जाण्यासाठी संस्थानं प्रसादाच्या पदार्थांमध्ये बदल केला आहे वरण भात ऐवजी मसाले भात आणि चपाती तसंच गुळ शिरा भाविकांना प्रसाद म्हणून शनिवारपासून दिला जात आहे
साईभक्तांना मिळणार एकच लाडु पाकिट ! शिर्डी साईबाबा संस्थानक डं सस्था साधारण : १० ते १२ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅस लागत असल्यानं तिथं दररोज 50 हजार लाडु पाकिटं बनवली जात होती तिथं आता २५ ते 30 हजार लाडु पाकिटं बनवली जात आहेत . प्रत्येक भाविकाला साईबाबांचा लाडु प्रसाद मिळावा यासाठी शनिवारपासून एका भाविकाला एकच लाडु पाकीट दिलं जात आहे.
भाविकांनी केलं संस्थानच्या निर्णयाचं स्वागत :
भाविकांची सेवा खंडित होऊ नये आणि प्रसाद वितरणाची परंपरा अखंड सुरू राहावी हा संस्थानचा मुख्य उद्देश आहे ‘ असं साई संस्थाननं स्पष्ट केलं आहे . गॅस पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर लाडू प्रसाद आणि प्रसादालयातील पुर्वीची व्यवस्था पुन्हा सुरु केली जाणीव ठेवून भाविकांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून साध्या लाडू प्रसाद आणि मुख्य प्रसादालाही साईसेवेचा भाव मानत भाविकां कडून स्वीकार होत आहे.




