सातारा:-वंचित बहुजन आघाडी सातारा पश्चिम जिल्ह्याची आढावा बैठक; संघटन बळकट करण्याचा निर्धार, १७ मार्चला कलेक्टर कार्यालयावर आक्रमक आंदोलन.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-वंचित बहुजन आघाडी सातारा पश्चिम जिल्ह्याची आढावा बैठक; संघटन बळकट करण्याचा निर्धार, १७ मार्चला कलेक्टर कार्यालयावर आक्रमक आंदोलन.

महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी उत्तम भालेराव
सातारा : वंचित बहुजन आघाडी सातारा पश्चिम जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी तसेच युवा कार्यकारिणी यांची संयुक्त आढावा बैठक शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सातारा येथील सर्किट हाऊस येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
बैठकीत काही तालुक्यांमध्ये नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या निषेधार्थ मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. दयानंद माने यांनी केले.
या बैठकीस उपाध्यक्ष बालासो जगताप, संदीप कांबळे, महासचिव दादासाहेब केंगार, सहसचिव योगेश कांबळे, आबा दगाणे, कोषाध्यक्ष मोहन खरात, भागवत करडे, दादासो कांबळे, मीडिया प्रमुख विकास चंदनशिवे, शहरप्रमुख मिलिंद कांबळे, युवकाध्यक्ष अमोल गंगावणे, विनोद ओकाळे, संदेश गायकवाड, रावसाहेब लोखंडे, तेजस ओकाळे, शुभम बळ्ळाळ, जावळी तालुका महासचिव कृष्णकांत सपकाळ, अशोक रोकडे, राजेंद्र शेवते, आदिनाथ बिराजे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, पाटण तालुका महासचिव शंकर शिंदे, कराड उत्तरचे विक्रम होवाळ, अधिकाराव सोनावळे, सुनील जाधव, समाधान कांबळे, युवा नेते योगेश शिंदे तसेच जिल्हा संघटक कुमार ओकाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून बहुजन समाजाच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




