आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-कॅनलच्या सिमेंट पाइपमध्ये अडकून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; हिंगणगाववर शोककळा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) फलटण:-कॅनलच्या सिमेंट पाइपमध्ये अडकून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; हिंगणगाववर शोककळा.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

फलटण, दि. १३ : सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून कॅनलमधील सिमेंट पाइपमध्ये अडकून तीन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील खानविलकर बंगल्या शेजारी असलेल्या कॅनलमध्ये ही दुर्घटना घडली. पोल्ट्री व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची ही तीन मुले खेळत असताना कॅनलमधील सिमेंट पाइपमध्ये गेली असावीत. मात्र पाइपमध्ये पाणी असल्याने आणि बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने ती आत अडकली.
बराच वेळ मुले दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना मुलांचा कॅनलमधील सिमेंट पाइपमध्ये अडकून मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

2) लोणंद:-पंढरपूरमध्ये ३१ मार्चला राज्यस्तरीय पुरस्कारांचा भव्य सोहळा; विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा होणार सन्मान.

लोणंद, दि. १३ : समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य’ तर्फे भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा येत्या ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत विठ्ठलाच्या पावन नगरीत, संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, पुणे रोड, पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या सोहळ्यात पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध मानाचे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारांमध्ये विशेष सन्मान म्हणून महाराष्ट्र समाज भूषण, जीवन गौरव, महाराष्ट्र रत्न, भारत भूषण हे पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच प्रेरणादायी पुरस्कारांत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि ‘उंच माझा झोका’ (नारीशक्ती) या पुरस्कारांचा समावेश आहे.
याशिवाय व्यावसायिक व सेवा क्षेत्रातील आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, अभियंता भूषण, आदर्श ग्रामसेवक या पुरस्कारांसह साहित्य व कला क्षेत्रातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक, कलारत्न, काव्य भूषण असे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पर्यावरण व शौर्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना वृक्षमित्र, पर्यावरण रक्षक, शौर्य पुरस्कार देण्यात येणार असून देशसेवा करणाऱ्या सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्तींनी आपले नाव, पत्ता, कार्याचा थोडक्यात अहवाल, आधार कार्ड, ई-मेल व फोटो पीडीएफ स्वरूपात २० मार्च २०२६ पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पत्रकार पांडुरंग कुंभार किंवा शकील मनियार यांच्याशी ९८६०२७३१३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button