मसूर:-महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाण्याचीवाडी येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मसूर:-महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाण्याचीवाडी येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
मसूर (ता. कराड ):-जि.प.प्राथमिक शाळा, वाण्याचीवाडी व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची, फनी गेम्स ,उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या .या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच प्रसिद्ध महिलांच्या वेशभूषा करून त्या व्यक्तिरेखा विद्यार्थिनींनी सादर केल्या.त्यानंतर माननीय डॉक्टर मनीषा शशिकांत खोत यांनी ‘महिलांचे आरोग्य व समस्या’ यावर मार्गदर्शन केले .त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ.सुनंदा अशोक पाटील, माजी केंद्रप्रमुख केंद्र उंब्रज यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले .त्यात त्यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, रोज सकाळी एक तास स्वतःसाठी व्यायाम करावा -त्यात सूर्यनमस्कार, प्राणायाम,योगासने करावे ,स्वयंपाक करताना मन शांत ठेवून, चांगले विचार मनात आणत व देवाचे नामस्मरण करावे म्हणजे स्वयंपाक रुचकर व चविष्ट होईल. खाणाऱ्याच्या मनातही चांगले विचार, संस्कार होतील. महिलांनी मोबाईल, टीव्ही टाळले तर मुलेही त्यापासून दूर राहतील. मुलांना रागावून ,चिडून मारण्यापेक्षा प्रेमाने समजवा त्याचा जास्त परिणाम होईल, पॅकेज फूडच्या ऐवजी घरात रुचकर अन्न बनवून द्यावे त्यामुळे मुले कॅन्सर व इतर दुर्धर आजारापासून लांब राहतील, फक्त चमचमीत अन्न शरीरास आरोग्यकारक नसून हानिकारक आहे याची मुलांना जाणीव करून द्या…. उपस्थित महिला त्यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाल्या व त्याप्रमाणे आपल्या पाल्यांना घडविण्याचे मान्य केले. त्यानंतर घेतलेल्या स्पर्धाचे प्रथम तीन क्रमांक व उखाणे स्पर्धेचे उत्तेजनार्थ क्रमांक यांना शाळेकडून बक्षीस देण्यात आले. तसेच जे विद्यार्थी घरी मोबाईल वापरत नाहीत अशा मुलांना बक्षीस देण्यात आले.त्याचे वितरण प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमा बाळासाहेब देसाई यांची होती. कार्यक्रम नीटनेटका पार पाडण्यासाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. आस्मा काझी यांनी केले. अंगणवाडी सेविका सौ. रोहिणी उमरदंड व मदतनीस सुरेखा धस, आशा सेविका श्रीम. शीला साळुंखे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य, पालक या सर्वांनीच मदत केली व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. उपस्थित सर्व महिलांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ही काळाची गरज आहे असेही त्यांनी बोलून दाखवले आणि आयोजकांना धन्यवाद दिले.




