साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक धडाका; लढाऊ नेतृत्वाच्या शोधासाठी इच्छुकांची कडवी राजकीय मुलाखत!
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक धडाका; लढाऊ नेतृत्वाच्या शोधासाठी इच्छुकांची कडवी राजकीय मुलाखत!

महाबळेश्वर प्रतिनिधी उत्तम भालेराव
संविधान, सामाजिक न्याय आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कसून चाचणी
क्रांतीताई सावंत व रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका कार्यकारिणीची प्रक्रिया वेगात
सातारा | प्रतिनिधी :
दि. ८ मार्च २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष क्रांतीताई सावंत तसेच राज्याध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा पश्चिम वतीने सातारा तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत संघटन बळकट करण्यासाठी सक्षम, धाडसी आणि विचारधारेप्रती निष्ठावान नेतृत्व निवडण्याचा ठाम निर्धार दिसून आला.
मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांना संविधान, सामाजिक न्याय, राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या यावर थेट व कठोर प्रश्न विचारण्यात आले. उमेदवारांच्या उत्तरांमधून त्यांच्या विचारांची ताकद, संघर्ष करण्याची तयारी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द यांची कसोटी पाहण्यात आली. अनेक उमेदवारांनी वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत संघटनेला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष अॅड. दयानंद माने, उपाध्यक्ष बाळासो जगताप, महासचिव निलेश लाड, सहसचिव योगेश कांबळे, मीडियाप्रमुख विकास चंदनशिवे, सल्लागार सुधाकर काकडे, श्रीरंग वाघमारे, समाधान कांबळे, धरके साहेब, राकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून सातारा तालुक्यात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जिद्दी, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व पुढे आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सामाजिक न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संदेश या मुलाखत प्रक्रियेतून देण्यात आला.
— प्रतिनिधी :
उत्तम भालेराव
संविधान प्रच्यारक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा सोशल मिडिया प्रमुख तालुका महाबळेश्वर
ता.महाबळेश्वर ९४०४२९४३४२




