माळेवाडी:-‘ मागेल त्याला सोलार पंप ‘ या योजनेत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवा – जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचा मुख्य अधीक्षक अभियंता यांना इशारा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

‘ मागेल त्याला सोलार पंप ‘ या योजनेत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवा – जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचा मुख्य अधीक्षक अभियंता यांना इशारा.

माळेवाडी (RPS स्टार न्यूजप्रतिनिधी ):- महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळण्याच्या उद्देशाने मागील त्याला सोलार पंप महत्वकांक्षी योजना शेतकऱ्यां साठी राबवली जात आहे.
परंतु सदर योजनेमध्ये सोलार कंपन्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत असल्याने आयडिया नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अहिल्या नगर जिल्ह्याचे वीज वितरण कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता श्रीयुत पवार साहेब व महा ऊर्जा अहिल्यानगर विभागाचे मुख्य प्रबंधक श्रीयुत जगताप साहेब यांना निवेदन देऊन सोलार मध्ये येत असलेल्या अडचणी बाबत लक्ष वेधले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, विलास पटारे, सतीश नाईक, सुदामराव औताडे, शैलेश वमने, साहेबराव चोरमल, दिलीप औताडे, रमेश औताडे, शरद ताके, भरत वमने ,रमेश असणे, सोपान दळे, संतोष दळे, शिवाजी दळे, मुजिद इनामदार, संतोष पटारे सतीश औताडे आदि कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचा समावेश होता.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, योजनेत पैसे पैसे भरून सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना आठ ते नऊ महिन्यापासून सोलार पंप न मिळणे, ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंप बसविले आहे त्यांच्या पंपाच्या देखभाल दुरुस्ती बाबत किमान पाच वर्षाची आम्ही असूनही वेळेत दुरुस्ती करून न देणे, वादळामुळे पण उडून गेले असताना पंचनामे होऊ नये त्यासंदर्भात इन्शुरन्स असतानाही दुरुस्ती करून न देणे, मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे सोलार पंप दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या गट नंबर मध्ये बसवून शेतकऱ्यांची फसवणूक करणे, वितरण कंपनीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाणी साठी शेतकऱ्यांना वेठीस धरून अप्रत्यक्ष पैशाची मागणी करणे, सातबारा उताऱ्यावर पिकप आणि सदरात सिंचनासाठी वीर किंवा बोर या श्रोताचा उल्लेख असतानाही इतर अधिकार सदरामध्ये बोर किंवा विहिरीचे नोंद असणे बंधनकारक करणे परंतु याबाबत मेहरबान तहसीलदार यांनी विहीर अथवा बोरच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर मालक सदराची त बंद केले असलेने पिकपा आणि सदरातील नोंदी धरणे आवश्यक आहे.
वीज वितरण कंपनीने सोलार योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वीज जोडणी बंद केली आहे.
आज रोजी शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी ही मिळत नाही व सोलार पंप ही मिळत नाही त्यामुळे सिंचित शेती करणे पाणी असून देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सोलार कंपन्यांना निर्देश देण्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच याबाबत दखल न घेतल्यास वीज वितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयात शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.




