शिरूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; सैनिक सोसायटीत एकाच रात्रीत ४ बंद फोडले फ्लॅट.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; सैनिक सोसायटीत एकाच रात्रीत ४ बंद फोडले फ्लॅट.

शिरूर प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे
शिरूर: शिरूर शहरातील सैनिक सोसायटीमधील ‘रुद्र रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत’ मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरीची मोठी घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत बंद असलेले तब्बल चार फ्लॅट फोडले असून, घरातील रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
जे नागरिक आपले घर बंद करून गावी किंवा बाहेरगावी गेले होते, नेमक्या त्याच फ्लॅट्सना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, प्रत्येक घरातून साधारण ५० हजार ते १ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता आहे. चोरी झालेल्या घरांच्या मालकांकडून नेमक्या नुकसानीची माहिती घेऊन उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार (FIR) दाखल करण्यात येणार आहे.
एकाच सोसायटीत सलग चार घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, जेणेकरून नागरिक सुरक्षित राहतील आणि शांत झोपू शकतील, अशी विनंती सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना केली आहे.




