नागठाणे:-“जागतिक महिला दिनी महिलांचा गौरव”.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) नागठाणे:-“जागतिक महिला दिनी महिलांचा गौरव”.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा नागठाणे येथे जागतिक महिला दिनाचे अवचित साधून भारतरत्न पुरस्कृत मा.सुवर्णा दिदी व सर्व महिलांचा सत्कार बोरगांव पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री. प्रशांत तुकाराम हुले साहेब, सातारा पंचायत समिती सदस्य मा.श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.अजित सदाशिव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हुले साहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले व शिक्षण, आरोग आणि स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन ही करण्यात आले
2) सातारा:-प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत विविध पदार्थांचे प्रदर्शन”.

सातारा:-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना अंतर्गत विविध अन्नपदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे. प्रदर्शनामध्ये घरगुती पातळीवर तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि पारंपरिक पदार्थ मांडण्यात आले होते.
यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी मा.श्री.संतोष पाटील साहेब, सातारा जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या मान्यवरांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले तसेच या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योजकांना आर्थिक व तांत्रिक मदत मिळत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बचत गटातील उद्योजक महिलांचा सत्कार जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




