भुसावळ:-“संत रविदासांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश”
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

“संत रविदासांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश”

भुसावळ (प्रतिनिधी): म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भुसावळ नगरपरिषद संचलित शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. जी. मेढे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजू समशेर उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस. एन. बनसोडे यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी राजू समशेर व मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रमुख अतिथी राजू समशेर यांनी संत रविदासांच्या विविध दोह्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना समतेचा व मानवतेचा संदेश दिला. तसेच एस. टी. चौधरी यांनी आपल्या मनोगतात संत रविदासांच्या कार्याचे महत्त्व विषद केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस. जी. मेढे यांनी संत रविदास महाराजांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




