माळेवाडी:-पुणे विभागीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. राजधर टेमकर यांचा राज्यस्तरीय गौरव; दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

पुणे विभागीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. राजधर टेमकर यांचा राज्यस्तरीय गौरव; दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर.

माळेवाडी (आरपीएस स्टार न्यूज प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य व तंत्र विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे बुधवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांना “पुणे विभागीय उत्कृष्ट प्राचार्य” म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी तसेच करिअर कट्टा उपक्रमातील सक्रिय सहभागामुळे हा बहुमान प्रदान करण्यात आला.
यावेळी मा. डॉ. नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन), मा. श्री. रुपेंद्र मोरे (संचालक, शासकीय मुद्रण व प्रकाशन संचालनालय, मुंबई) तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे यांच्या हस्ते डॉ. टेमकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास मा. श्री. सचिन इटकर (क्षेत्रीय संचालक, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, मुंबई), मा. सोनाली लोहार (ऑडिओलॉजिस्ट व व्हॉइस थेरपिस्ट), मा. मिथिला दळवी (संस्थापिका, संवाद अ डायलॉग) तसेच मा. डिंपल मितल (तज्ज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सन्मान स्विकारल्यानंतर प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अण्णासाहेब राजळे (काका), आमदार मा. मोनिकाताई रावजी राजळे, विश्वस्त मा. राहुल दादा राजळे, सचिव मा. नितीन शिंदे, मा. रवींद्र महाजन, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव राजळे, मार्गदर्शक मा. भास्करराव पेरे तसेच सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आल्याचे अधोरेखित झाले असून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाची भर पडली आहे.




