माळेवाडी:-ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे यांचा 75 वा अभिष्ट चिंतन सोहळा पूर्ण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माळेवाडी:-ज्येष्ठ पत्रकार बी आर चेडे यांचा 75 वा अभिष्ट चिंतन सोहळा पूर्ण.

श्रीरामपूर प्रतिनिधी – संजय पगारे
माळेवाडी ( RPS स्टार न्यूज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मातृभूमीत जन्मलेले पत्रकार व फोटोग्राफर बी आर उर्फ बाबासाहेब रामकृष्ण चेडे यांच्या जीवनातील आज वयाची 75 वर्षे पूर्ण होऊन 76 व्या वर्षात पदार्पण होत आहे.त्यांना चार मुली असून हरेगाव येथील शेती महामंडळामध्ये नोकरीस असताना त्यांना कठीण परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण दिले व स्वतःच्या पायावर उभे केले.त्यांचे विवाह केले पत्रकार चेडे यांचे 1967 यावर्षी एसएससी पर्यंत शिक्षण झाले..त्याच वर्षी शेती महामंडळात रु 2.97 प्रतिदिन रोजंदारीने नोकरीस सुरुवात केली.1994 या वर्षापर्यंत क्लार्क श्रेणी तीन मध्ये कार्यरत असताना शेती महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती देऊन अनेक कामगारांना नोकरीच मुकावे लागले त्यानंतर हरेगाव सारखा कारखाना सुद्धा बंद पडला त्यामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय सुद्धा कमी झाला म्हणून चेडे यांनी हरेगाव सोडून श्रीरामपूर येथे येण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय करता आला व प्रगती झाली व 1970 पासून छायाचित्रण करताना वर्तमानपत्रात बातम्या देण्याचे काम सुरू केले जवळपास 51 वर्ष या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक शैक्षणिक कामगार आदी क्षेत्राचा अनुभव आला त्यासाठी जिल्ह्यात राज्यात तसेच पूर्ण देशात फिरायचा व धार्मिक प्रेक्षणीय स्थळे पहाण्याचा आनंद झाला.राजकीय नेत्यांसोबत सहवासाची संधी मिळाली व त्या कामाची पावती म्हणून अनेक संस्थांनी सत्कार केले व पुरस्कार सुद्धा दिले त्याचप्रमाणे त्यांची जागतिक संविधान सदस्य पदी निवड झाली व भूमी फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेत राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरेगाव मतमाऊली यात्रेचे छायाचित्रण व वृत्त प्रसारित करण्याचे काम गेल्या 40 वर्षापासून करत आहे तसेच सार्वमत पुढारी नवराष्ट्र स्नेहप्रकाश आदी सर्व वर्तमानपत्रात काम करण्याची त्यांना संधी मिळाली . चेडे म्हणाले हरेगावच्या आमच्या सहकाऱ्यांची मात्र सारखी आठवण येत असते सहकारी मात्र त्यांना सतत काका म्हणायचे .हरीगावावरील प्रेम व व तेथील माणसे सुख दुःखात जीवापाड माया देणाऱ्या माणसांना ते विसरले नाही .संकटाच्या काळातील त्या दुःखद आठवणी सांगताना आजही त्यांचा कंठ दाटून येतो .दुसऱ्यांच्या सुखदुःखाचे क्षण कॅमेरात टिपणारा या हळव्या काळजाच्या मायाळू माणसाने हरीगावची अनेक स्थितंत्यरे अनेक चढ उतार आपल्या हृदयाच्या कॅमेरात बंदिस्त केले .तितक्याच आत्मीयतेने हे जीवनातल्या वाटले हळवे क्षण जपले आहे .श्रीरामपूरला आल्यावरही नवीन पत्रकार,संपादकांच्या भेटीगाठी झाल्या सर्व छायाचित्रकार सुद्धा ओळखीचे झाले .बजरंग गुळस्कर परिवार यांचे सह सर्वांनी जीवनात भरघोस सहकार्य केले व मोलाचे मार्गदर्शनही केले.अशाप्रकारे जीवन संघर्ष करता करता त्यांनी 75 वर्ष पूर्ण केले व आनंद वाटला.आता तर ते दूरध्वनीवर व्हाट्सअप वर ई-मेल द्वारे तातडीने बातम्या देत असतात . आसपासच्या गावात सार्वजनिक कार्यक्रम असो फोटोग्राफीत ते मग असायचे.चेडे गरम भजी खाण्यात तर्फे जायचे.सायकल असो की मोटर सायकल असो ते बिनधास्त हात सोडून चालणार आज सुद्धा हात हात सोडून नमस्कार करतात.ते कधीही धडपडलेले दिसत नाहीत.हरीगाव येथून एकदा तीस डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हरेगाव चर्चचा ख्रिसमस कार्यक्रम आटोपून श्रीरामपूरला घरी परतत असताना समोरून बरीच वाहने येत असताना जास्त प्रकाश झोतात केल्याने डोळे दिपले गेल्याने श्रीरामपूरकडे जाणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाडीला पाठीमागून आमचे चेडे धडकले पडले पाठी मागून येणाऱ्या वाहनस्वारांनी विचारपूस केली स्कुटी उचलून ठेवली चेडे यांना पाहिले तर फक्त गुडघ्याला खर्चटलेले .इतरांना समजल्यावर मदतीसाठी आले व चौकशी केली तर त्यांनी सांगितले फक्त गुडघ्याला लागले चष्मा कॅमेरा सर्व सुरक्षित असताना कुठेही जखम झाली नाही.तुम्ही कसे वाचले असे विचारले असता चेडे यांनी सांगितले की हा मतमाऊलीचा चमत्कार आहे .घरी आल्यावर एक रुपयाचा दवाखाना नाही.काहींनी विचारले अपघाताची बातमी आम्ही टाकतो त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला.त्यांना प्रसिद्धीची हाव नसली तरी त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना प्रसिद्धी दिली पण एखाद्याचे नाव वर्तमानपत्रात आले नाही किंवा वृत्तपत्राकडून जागेअभावी वगळण्यात आले मात्र दूरध्वनीवर दोन-चार शब्द ऐकायची मात्र त्यांना वर्षानुवर्ष सवय लागली होती .त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1951 रोजी हरीगावात झाला.चेडे यांच्या 75 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास या सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना भावी आयुष्य सुखा समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा पद्धतीचे उदगार काढण्यात आले.




