“वाईत विनापरवाना अनाधिकृत बांधकामचा सुळसुळाट,. अनाधिकृत बांधकाम विरोधी पथक नेमण्यास वाई नगर पालिकेला मुहूर्त कधी?”
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) “वाईत विनापरवाना अनाधिकृत बांधकामचा सुळसुळाट,. अनाधिकृत बांधकाम विरोधी पथक नेमण्यास वाई नगर पालिकेला मुहूर्त कधी?”

वाई प्रतिनिधी नित्यानंद मोरे
सातारा वाई.
वाई शहरात विनापरवाना अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. या विनापरवानाधिकृत बांधकामामुळे शहराचे विद्रूपीकरण हे मोठ्याप्रमाणात वाढत चालले आहे. वाढत चाललेल्या या विद्रुपीकरणामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.मनमानी पद्धतीने विनापरवाना अनधिकृत बांधकामे झाली आहेत, होत आहेत व होत राहतील मात्र वाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब हे त्यांना असलेल्या अधिकारांचे पालन करण्यासाठी मुहूर्त शोधत आहेत का? हा मुहूर्त आज अखेर पर्यंत का पहाण्यात आला नाही याच्य मागचे कारण काय कामात दुर्लक्ष की अजून काय ? महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वेय महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे *शासन निर्णय महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५२ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ आणि ५६ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी व अनाधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी यांनी नगर परिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 152 ( 3) नुसार संबंधित अधिकाऱ्यास त्याच कार्यक्षेत्राकरिता पद निर्देशित अधिकारी म्हणून अधिसूचित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.* या प्रमाणे नगरपरिषदांमध्ये बांधकाम विरोधी पथक नेमण्याचा अधिकार हा मुख्याधिकारी यांना आहे. मात्र वाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून वाई नगरपरिषद नगररचना बांधकाम विभागात बांधकाम विरोधी पथकाची नेमणूक का करत नाहीत गेली अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? बहुतेक अर्थकारण तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य वाईकर नागरिक करत आहेत विनापरवानाधिकृत बांधकामे यामुळे वाई शहरात दिवसेंदिवेस फार मोठी समस्या निर्माण होत चालल्या आहेत. वाई शहरातल्या रस्त्यांनी गल्लीबोळांचे रूप धारण केले आहे. पार्कींगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे यासाठी वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी तत्परतेने पुढाकार घेऊन ठराव आणून वाई नगर परिषद नगर रचना बांधकाम विभागात बांधकाम विरोधी पथकाची नेमणूक करतील का? वाईत वाढत्या अनाधिकृत बांधकामांमुळे वाईचे वाढत चाललेले विद्रुपीकरण थांबवतील का?असा थेट प्रश्नच वाईकर नागरिक करत आहेत.
2) वाई:-ओवर लोड वाहनांमुळे वाई शहरात वारोंवार वाहतूक कोंडी! प्रशासनाच्या दुर्लक्षाचे कारण नक्की काय?

सातारा वाई. दि.१७
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाई शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे या वाहतूक कोंडीचा त्रासाने वाईकर नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. वाई शहरात एसटी स्टँड , किसनवीर चौक, शासकीय रुग्णालय ,भाजी मंडई घोटवडेकर हॉस्पिटल, गणपती घाट परिसर, या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते. वाई शहरातील रस्ते हे लहान असून याच रस्त्यांच्या दोन्ही बाजूस मन मर्जीने होणारे पार्किंग या मनमर्जीने होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच होऊन बसली आहे मात्र याचा त्रास शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक, रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. वाई मध्ये ओव्हरलोड अवजड बारा टायरच्या वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत आहे या अवजड वाहनांची वर्दळ विष्णू मंदिर दे जैन मंदिर या परिसरात वारंवार आढळून येते यामुळे येथेही वारंवार वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असते अवजड वाहनांना वाई शहरांमध्ये येण्यास वाई नगर परिषदेने रोखथांब ही मागील काही वर्षांपासून केलेली आहे. तरीही ही ओव्हरलोड अवजड वाहने राजरोसपणे वाई शहरात ये जा करत असतात. मात्र यावर कारवाई झालेली कधीही दिसून येत नाही वाई शहर वाहतूक नियंत्रण प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? काही मिलीभगत तर नाही ना? याची चर्चा मात्र रंगताना दिसत आहे. वाई शहर वाहतूक प्रशासनाने यासाठी ठोस पावले उचलावीत योग्य नियमावली तयार करावी व अशा अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाईकर नागरिकांकडून केली जात आहे.




