वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ऑपरेशन ऑल आउट’; संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त, ८३ जणांवर कारवाई.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ऑपरेशन ऑल आउट’; संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त, ८३ जणांवर कारवाई.

वाई प्रतिनिधी | सारिका गवते |
वाई दि. १७ : शहर व परिसरातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाई पोलिसांनी सोमवारी पहाटेच ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवत धडक कारवाई केली. सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या दरम्यान तब्बल ८३ अमलदार, ५ वाहने तसेच स्थानिक गुन्हे शाखा, आर.सी.पी. पथक आणि १ अधिकारी यांच्या सहभागाने ही व्यापक मोहीम पार पडली.
या कारवाईत १२ संशयित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १० दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये पोलिसांनी अचानक धडक देत गुन्हेगार, फरारी तसेच गोंधळ माजविणाऱ्या प्रवृत्तींची कसून झडती घेतली.
वाई शहरातील किसानवीर चौक, जामा मस्जिद परिसर, ताहेरशाह मशिदीचा परिसर, चावडी चौक, दातार टॉवर परिसर, ब्राह्मणशाही, आंबेडकर चौक, महागणपती घाट, कृष्णा पूल तसेच वाई पोलीस ठाणे परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी ११.४० वाजता वाई पोलीस ठाणे येथे सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.
आर.एल.एफ. जवानांकडून संवेदनशील ठिकाणे, धार्मिक स्थळे, राजकीय व जातीय संघटनांची हालचाल, तसेच गुंड प्रवृत्ती व फरार आरोपी यांची माहिती संकलित करण्यात आली. धार्मिक स्थळांमधील लोकवस्ती, सोपानकुटुंबीय व संशयितांची पडताळणी करून परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात आली.
पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मनात धडकी भरली असून सर्वसामान्य नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
ही संपूर्ण मोहीम वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




