क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिर्डी:-गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण जाहीर होणार : डॉ.सुजय विखे पाटील

पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिर्डी:-गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण जाहीर होणार : डॉ.सुजय विखे पाटील

शिर्डी | प्रतिनिधी (RPS STAR NEW)

शिर्डीतील खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. खून प्रकरणातील आरोपी राहत असलेल्या अतिक्रमित घराला नोटीस बजावण्यात आली असून, आठवडाभरात अतिक्रमण हटवले नाही तर नगरपंचायतीमार्फत जेसीबीच्या साहाय्याने ते हटविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, शिर्डीत घडलेली हत्या अत्यंत दुर्दैवी असून, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि नियमानुसार कारवाई प्रत्येकावर केली जाईल. संबंधित आरोपीला अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आली असून, मुदतीत कारवाई न झाल्यास प्रशासन स्वतः अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंदिर परिसरातील अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र हॉकर झोन विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साई मंदिराच्या चारही बाजूंच्या परिसरात कोणत्याही प्रकारची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नसून, पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येईल. कोण व्यवसाय करू शकतो, कोणत्या ठिकाणी व्यवसाय करता येईल आणि कोणत्या वस्तूंची विक्री करता येईल, याबाबतची सविस्तर नियमावली ग्रामस्थ, व्यापारी आणि संबंधित घटकांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणारे, जादा दर आकारणारे किंवा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगत डॉ. विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकरणात केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर संबंधित दुकानमालक आणि जागामालकावरही गुन्हे दाखल करण्यात येतील. गरीब विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; त्यामागील मूळ सूत्रधारांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मंदिर परिसरातील फुले, प्रसाद, शाल आणि इतर पूजासाहित्याच्या विक्रीबाबत साई संस्थानने स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थानने कोणत्या वस्तूंना परवानगी असेल आणि कोणत्या वस्तू मंदिरात स्वीकारल्या जातील, याबाबत ठोस निर्णय घेतल्यास भाविकांची लूट आणि अनधिकृत विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

पथविक्रेत्यांसाठीची अंतिम नियमावली येत्या आठवडाभरात ग्रामस्थांच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार व्यवसाय बंद-चालू करण्याऐवजी सर्वांना न्याय देणारा आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. विखे पाटील यांनी शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत, खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे नमूद केले. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. भाविकांची सुरक्षितता, शहरातील शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व कठोर निर्णय राबविले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button