क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-भुईंज पोलीसांची दमदार कारवाई.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई दि-28

वाई:-भुईंज पोलीसांची दमदार कारवाई  – भुईंज,कुडाळ, बावधन परीसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातुन जनावरे चोरी करणारी पिकअप गैंग भुईंज पोलीसांकडुन जेरबंद.

दिनांक १९/०६/२०२६ रोजी रात्री ०८.०० वा. ते दिनांक २०/०६/२०२६ रोजी सकाळी ०८.०० वा.चे दरम्याण मौजे कवठे, ता. वाई गावचे हद्दीतुन यातील फिर्यादी यांचे गोठ्यातुन दोन मुहा जातीच्या म्हैशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत किरण नानासो पोळ रा.कवठे, ता. वाई, जि. सातारा यांनी तक्रार दिल्याने भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. २१५/२०२६ बी.एन.एस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अचानक रात्रीच्या वेळी शेतकन्यांचे गोठ्यातुन जनावरे चोरीस जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे व सदरचा गुन्हा हा शेतकऱ्यांशी संबंधीत असल्यामुळे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. निखील पिंगळे भा.पो.से., पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. सुनिल साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या पुथ्वीराज ताटे प्रभारी अधिकारी भुईज पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या, त्याअनुषंगाने पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणेचे एक विशेष पथक तयार केले होते. सदर पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेवुन त्यांचे ठावठिकाण्याची माहिती घेतली असता सदर आरोपी हे वाई येथुन एका पिकअप मधुन पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळालेनंतर पाचवड चौक येथे भुईंज पोलीसांनी सापळा रचुन सदर आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर सदर आरोपींना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन सदर आरोपींनी कवठे येथील ०२ म्हैशी, ओझर्डे येथील ०१ म्हैस, खडकी येथील ०१ जर्शी गाय, तसेच कुडाळ येथील ०२ म्हैस, चोरी करुन त्या चाकण, जि.पुणे, काष्टी- श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, सांगोला जि. सोलापुर, येथील गुरांच्या बाजारामध्ये विक्री केल्याचे सांगितले. सदर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली असुन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आले आहे. सदर आरोपींना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेवून त्यांनी चोरी केलेल्या गायी, म्हैशी कोणत्या व्यापाऱ्याकडे व कोणत्या ठिकाणी विक्री केल्या आहेत याबाबत शोध घेवुन त्या परत मिळवण्याची पक्रिया सुरु आहे. सदची कारवाई बेंदुर सणादिवशी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर कारवाई मा. निखील पिंगळे भा.पो.से., पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. सुनिल साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज ताटे सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे, पो.उ.नि. सुरेश शिंदे भुईंज पोलीस ठाणे, तसेच भुईंज पोलीस ठाणेचे, पोहवा नितीन जाधव, पो.हवा. धायगुडे, पोकॉ. सोमनाथ बल्लाळ, पोकॉ. सागर मोहिते, पोकॉ किरण निंबाळकर यांनी पार पाडली आहे.

(मा.पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मान्यतेने

अटक आरोपींची नावे –

१) सुरेश ऊर्फ सुर्यकांत आनंदराव चव्हाण वय ३५ वर्षे रा.पाचवड,ता. वाई, जि.सातारा

२) संदेश हणमंत पिसाळ वय २७ वर्षे, रा.व्याजवाडी,ता.वाई,जि.सातारा

३) हर्षद हिंदुराव चव्हाण वय १८ वर्षे, रा. कडेगांव,ता.वाई,जि.सातारा.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button