मुंबई:-मालवणी पोलीस ठाण्याची धुरा आता कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या हाती!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मालवणी पोलीस ठाण्याची धुरा आता कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या हाती!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांची मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती; ‘अवैध धंद्यांना थारा नाही, कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य!’
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई शहर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.राणी पुरी यांनी नुकताच मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मालवणी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी या यापूर्वी वनराई पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. मुंबई शहर पोलीस दलात त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळत आपल्या कार्यक्षमतेची आणि कर्तव्यनिष्ठेची छाप पाडली आहे.
मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. राणी पुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि गुन्हेगारीविरोधातील उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले.
“मालवणी परिसरात कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. चुकीला माफी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेला माझ्याकडून सर्वोच्च प्राधान्य राहील,” असा स्पष्ट संदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे मालवणी पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकाऱ्याची धुरा मिळाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
‘अवैध धंद्यांवर कडक कारवाई, गुन्हेगारीला लगाम आणि कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य’ या भूमिकेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या कार्यकाळाकडे मालवणीकरांचे लक्ष लागले आहे.




