आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराजांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेट.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराजांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेट.

आगामी १७९ व्या सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले निमंत्रण.

श्रीरामपूर प्रतिनिधी

श्रीरामपूर एमआयडीसीलगत तसेच राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या १७९ व्या सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाच्या निमित्ताने सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी आज मंगळवारी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान महंत रामगिरीजी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आगामी १७९ व्या सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाचे औपचारिक निमंत्रण दिले. या सप्ताहाला राज्यभरातून तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाला अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष महत्त्व असून, या सप्ताहाच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला जातो. त्यामुळे आगामी सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
या प्रसंगी मधु महाराज, कापसेजी, धोर्डेजी यांच्यासह दीपक पटारे, गिरधर आसने आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसोबत झालेल्या या भेटीत सप्ताहाच्या आयोजनाबाबत तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या विविध बाबींवरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button