लोणी:-स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत मोठी नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

लोणी:-स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत मोठी नियुक्ती.

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत मोठी नियुक्ती –
अनुपम सेल्स कॉर्पोरेशन,लोणी चे संचालक माननीय उमेश भिमराज पन्हाळे यांना अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा!
लोणी/ प्रतिनिधी,स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राहता तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राहता तालुका कार्याध्यक्ष संपत निर्मळ (आबा), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे व श्रीपाद बोकंद यांनी एकमताने ठराव मंजूर केला. या ठरावास सोलापूर कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत वेधपाठक साहेब यांनी अधिकृत अनुमोदन दिले.
या ठरावानुसार अनुपम सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक, लोणी (ता. राहता) येथील उमेश भिमराज पन्हाळे यांची अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेश पन्हाळे हे केवळ यशस्वी उद्योजक नसून, त्यांच्या अंगी समाजाप्रती अपार प्रेम, आदर व जिव्हाळा असून, समाजसेवा हीच त्यांची ओळख बनली आहे. ह.भ.प गोरक्ष देठे महाराज यांनी उमेश पन्हाळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशी गरजूंसाठी तत्पर मदत, सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग आणि संघटनात्मक कामकाजातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांचे नाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीमुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व मान्यवरांनी उमेश पन्हाळे यांचे मनापासून अभिनंदन करत, पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्य मराठी पत्रकार परिषद अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष, शहाजी दिघे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी पत्रकार शंकर सोनवणे, संदीप गावडे, महेश भोसले, ज्ञानेश्वर साबळे कैलास वाघमारे, कैलास विखे अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित, सिने, कलाकार- ज्ञानदेव शिंदे यांची उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.




