वाई:-कळंभे गावचे सुपूत्र,शिवसैनिक, तालुका शिवसेना नेते,उत्तम व्यावसायिक,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रकाशराव बाबर यांना “राष्ट्रीय पातळीवरील” “आदर्श उपसरपंच पुरस्कार” जाहीर.
संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई:-कळंभे गावचे सुपूत्र, शिवसैनिक, तालुका शिवसेना नेते,उत्तम व्यावसायिक,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रकाशराव बाबर यांना “राष्ट्रीय पातळीवरील” “आदर्श उपसरपंच पुरस्कार” जाहीर.
कळंभे गावचे सुपूत्र, शिवसैनिक, तालुका शिवसेना नेते,उत्तम व्यावसायिक,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रकाशराव बाबर यांना “राष्ट्रीय पातळीवरील” “आदर्श उपसरपंच पुरस्कार” जाहीर झाला आहे!
सतत समाजातील शेवटच्या घटकाची काळजी करणारे प्रकाश राव, गावातील, विभागातील सर्वसामान्याची कामे करण्यासाठी गावात अन् वाईला सहज उपलब्ध असतात.
त्यांच्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य काळात त्यांनी गावात तत्कालीन पालकमंत्री ना. विजयबापू शिवथरे, माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंत्री मकरंदआबा पाटील,खा.उदयनराजे भोसले खा. नितीनकाका पाटील,आ.शशिकांत शिंदे,माजी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री श्री.शंभुराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानगुडे पाटील, मा.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेशराव शिंदे (भुईंज)यांच्या विकासनिधीच्या माध्यमातून 6ते 7 कोटीची विकासकामे करून कळंबे गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे!
उद्या राजधानी दिल्ली येथे त्यांना पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील बाबर विमानानं दिल्लीला जात आहेत.याचा आम्हाला अभिमान अन् आनंद आहे असे ग्रामस्थांनी कौतुक केले.
प्रकाश बाबरांची सामाजिक, राजकीय कारकीर्द अशीच बहरत राहो, गावाची, विभागाची,समाजाची सेवा त्याच्या हातून सतत घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
“आदर्श राष्ट्रीय उपसरपंच” पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.