वाई:-डॉ.अभिजीत चौधरी यांची कॅलिफोर्निया विद्यापीठात संचालकपदी निवड.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई, दि. १९
डॉ. अभिजीत चौधरी यांची कॅलिफोर्निया विद्यापीठात संचालकपदी निवड.
डॉ. अभिजीत चौधरी यांची अमेरिकेच्या डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात इमेजिंग रिसर्च सेंटरच्या कायम संचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. डॉ. अभिजीत हे विद्यापीठाच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक असून, यापूर्वी ते तात्पुरत्या स्वरूपात त्या विभागात संचालक म्हणून काम पाहत होते. शिवाय ते युसीडेवीस मोलेक्युलर अँड जीनॉमिक इमेजिंग सेंटरच्या संचालक पदी कार्यरत असून, राष्ट्रीय प्रिमेट सेंटरचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम पहात आहेत. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली रिसर्च सेंटरमध्ये बहुशास्त्रीय सहकार्य, वैद्यकीय चिकित्सा,सावधानता, आचार यांसंबंधी संशोधन केले जाते. शरीरामधील जनुकीय प्रतिमांकन तंत्रज्ञान विकसित करून आजारांची माहिती घेतली जाते. त्यासाठी पॉझिट्रॉन उत्सर्जन प्रतिमा विज्ञान व चुंबकीय नादकता प्रतिमांकन (एमआरआय) पद्धतीचा विनियोग केला जातो. केंद्राच्या संशोधन कार्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ व नॅशनल सायन्स फाऊंडेशन यांचेकडून निधी व नॅशनल सायन्स फाऊंडेशन यांचे कडून निधी दिला जातो.
डॉ.अभिजीत यांचे मूळ गाव केंजळ, ता. वाई हे असून, त्यांचे शालेय शिक्षण पाचगणी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झालेले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजिलिस येथून त्यांनी एम
एस व पीएच.डी. या पदव्या विशेष प्राविण्यासह संपादन केलेल्या आहेत. डॉ. अभिजीत हे केंजळ गावची शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या वाईच्या जनता शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य डॉ. जयवंत चौधरी व डॉ. सौदामिनी चौधरी यांचे सुपुत्र आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील चारही सदस्य डॉक्टरेट आहेत.
डॉ. अभिजीत यांच्या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, खजिनदार नारायणराव चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, मॅप्रोचे प्रमुख मयूर व्होरा, पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष व सदस्य तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, केंजळचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.