पुणे:-(वारजे)-गोकुळ नगर पठार वारजे या भागामध्ये समान पाणी मिळावे या मागणीसाठी एसएनडीटी पाणीपुरवठा या केंद्रावर नागरिकांचा धडक मोर्चा.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गोकुळ नगर पठार वारजे या भागामध्ये समान पाणी मिळावे या मागणीसाठी एसएनडीटी पाणीपुरवठा या केंद्रावर नागरिकांचा धडक मोर्चा.
पुणे प्रतिनिधी : गोकुळ नगर पठार वारजे या भागामध्ये समान पाणी मिळावे या मागणीसाठी एसएनडीटी पाणीपुरवठा विभाग या ठिकाणी गोकुळ नगर पठार या भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागावरती मोर्चा काढण्यात आला. त्या ठिकाणी बासरी वाजवून तसे थाळी वाजवून रिकामे माठ घेऊन आंदोलन करण्यात आले. या भागात गेले पंधरा वर्षे राहत असून अजून सुद्धा नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. तीन पट टॅक्स भरून सुद्धा पाणी मिळत नाही या भागातून कोट्यविधीचा टॅक्स जमा करण्यात येतो तरीसुद्धा लोकांना मुबलक पाणी मिळत नाही. या मागणीसाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये गोकुळ नगरपठरावरील सर्व नागरिक उपस्थित होते याच्यामध्ये भिमाबाई गुरव मीना चौरसिया पठाण चाची अंबीका राठोड नेहा गायकवाड कल्याण नामुळे रफिक शेख विनोद मजदे गणेश पानपाटील विभूती चौरसिया बोला सिंग भिम राठोड असे असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.