सायगाव:-श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र मेरुलिंग येथे भाविकांचे अलोट गर्दी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र मेरुलिंग येथे भाविकांचे अलोट गर्दी.
सायगाव दि: जावळी तालुक्यातील श्री क्षेत्र मेरुलिंग या ठिकाणी आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी जमली होती. श्री क्षेत्र मेरुलिंग शंभू महादेव मंदिर (नरफदेव) या ठिकाणी पूजाअर्चा करण्यासाठी चांगली सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे काही काळ वाहनांची गर्दी तसेच दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती.
ग्रामस्थ मंडळ ,मेरुलिंग यांच्या वतीने मासिक शिवरात्रि रुद्र अभिषेक प्रत्येक महिन्यात एका कुटुंबाच्या हस्ते संपन्न होत आहे. याचा सहकुटुंब सहपरिवार लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात सकाळी सात ते नऊ वाजता महारुद्र अभिषेक, सकाळी नऊ वाजता दहीभात पिंड लेपन पूजा, सकाळी दहा वाजता शंभू महादेवाची महाआरती, सकाळी दहा ते दुपारी बारा वाजता भजन मंडळ यांचे सुस्वर भजन आणि दुपारी बारा नंतर महाप्रसाद भाविकांना देण्यात येत आहे. रविवारी २५ मे रोजी रुद्र अभिषेक सुरू झाला. ऑगस्ट महिन्यातील गुरुवारी दिनांक २१ रोजी त्यानंतर शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर, रविवार दिनांक १९ ऑक्टोबर, मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर, गुरुवार दिनांक १८ डिसेंबर आणि शुक्रवार दिनांक १६ जानेवारी ,रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आणि मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी रुद्राभिषेक होणार आहे.
या रुद्राभिषेकासाठी पुरोहित जंगम स्वामी, श्री भिकू शिवराम जंगम स्वामी, सुभाष बाळकृष्ण जंगम स्वामी पूजाअर्चा करत आहेत. ज्या भाविकांना रुद्राभिषेक करायचा असेल त्यांनी अशोक साबळे, विनायक जंगम, विशाल साबळे, सचिन साबळे यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आलेले आहे. आज मेढा मार्गे आनेवाडी मार्गे आणि धावडशी मार्गी मिळेल त्या वाहनाने भाविक मेरू लिंग च्या दिशेने येत होते. पावसाने उघडीत दिल्यामुळे तरुणाई फोटो काढण्यामध्ये मग्न होती. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेवटच्या श्रावणी सोमवारी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी श्री संतोष पाटील व पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी आणि सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी भेट द्यावी यासाठी भाविकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.