आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-बऱ्याच वर्षांनी साताऱ्यात दिसू लागला प्रेमाचा त्रिकोण.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

बऱ्याच वर्षांनी साताऱ्यात दिसू लागला प्रेमाचा त्रिकोण.

सातारा दि: सध्या एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चाललेली आहे. त्याला कारणही अनेक असू शकतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध मध्ये आलेला दुरावा हाच आहे. परंतु आजही काही कुटुंब हे एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात. त्यामध्ये आता सासू, सून, लेक प्रेमाचा ही त्रिकोण पाहण्यास मिळालेला आहे
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सायगाव ता. जावली येथील श्रीमती भारती विजय गंगावणे मूळगाव सोनके ता. कोरेगाव या सातारमध्ये राहतात. त्यांनी आपली सून सौ. सुप्रिया अमोल गंगावणे व मुलगी भारतीय बौद्ध महासभा शाखा लोणंद महिला अध्यक्षा सौ. प्रीती राहुल खरात रा . लोणंद ता. खंडाळा या नंणद भावजयचा एकत्रित वाढदिवस साजरा करून खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबामध्ये एक आनंदाचा फुलबाज्या उडवण्यात यश मिळवले आहे.
सध्या वृत्त मालिका व इतर काही प्रासंगिक कारणांमुळे अनेक घरांमध्ये गैरसमज, वादविवाद होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ही सासूपेक्षाही सून आणि लेक म्हणजेच नणंद व भावजय यांच्यामध्येच दिसून येत आहे. अगदी हुंडाबळी तसेच अनेक गंभीर आरोपांमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. कमीपणा कोणी ही घेण्यास तयार नाही. कौटुंबिक न्यायालयातही अनेक प्रकरण प्रलंबित आहेत.
याची खमंग चर्चा शेजारी पाजारी व आप्तेष्ट हे चवीने करत असतात. यातून आता बोध घेण्यासारखा प्रकार साताऱ्यातील चाहूर खेड येथील गजानन कॉलनी मध्ये पाहण्यास मिळाला आहे.
श्रीमती भारती विजय गंगावणे यांनी सून व लेक या दोघींचाही एकत्रित वाढदिवस आनंदात साजरा करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या भूमिकेच्या सर्वत्र स्वागत होत आहे. या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष अमोल गंगावणे व लोणंद नगरीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल खरात व मामा अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माही , पिहू, अनुष्का, तनिष्का या चिमुकल्यांना ही बालपणी एक चांगला संदेश मिळाला आहे.

———————————————
फोटो – प्रेमाचा त्रिकोण,,,

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button