ताज्या घडामोडी

सातारा:-साताऱ्यात उघडले नव्या राष्ट्रवादीचे दार….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

साताऱ्यात उघडले नव्या राष्ट्रवादीचे दार….

सातारा दि: महाराष्ट्रात २६ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य केले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली त्यानंतर धाडसी नेतृत्व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाला . पण विधानसभेला सातारा जिल्ह्यात पहिलीच उमेदवारी जाहीर करणाऱ्या उमेदवाराने स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण , साताऱ्यातील नव्या राष्ट्रवादीचे कार्यालय बंद होते आज बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादी कार्यालयाचा दरवाजा उघडा पाहून अनेकांना मनस्वी आनंद झाला.
सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पाडल्या नंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी हालचाली करण्यात आल्या. याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अपवाद ठरलेले आहे. कारण, नव्याने बांधली करताना घड्याळ तेच.. वेळ नवी.. पण ठेकेदार कार्यकर्ते तेच सामान्य कार्यकर्ता वंचित हे ओघाने आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्तेचा करिष्मा पाहण्यास मिळाला. नेहमीच दरवाजे बंद असलेल्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा कार्यालयात आज सातारा जिल्ह्यातील सत्तेच्या करिष्मा पाहून कार्यकर्त्यांचे आगमन झाले. नवीन पदाधिकाऱ्यांना पद वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तारण्याचे काम सुरू झाले. वास्तविक पाहता ब्रीद वाक्य असलेल्या या पक्षाला घराणेशाही व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नसल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते बोलून दाखवू लागलेले आहेत.
आज नव्या राष्ट्रवादी कार्यालयात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष म्हणून सातारा जिल्ह्यात स्थान राहिलेले नाही. बालेकिल्ला पाहिलेला नाही. मंत्रीपद मिळाले असले तरी जुन्यांचे पुनर्वसन व नव्यांना मदत करणे लांबच राहिलेले आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीची धुरा सांभाळण्यासाठी सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, खासदार नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, युवा नेते पृथ्वीराज गोडसे, युवा नेते शिवरूपराजे खर्डेकर, श्रीनिवास शिंदे, सागर भोगावकर त्याचबरोबर अनेक रथी व महारथी उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे निमंत्रण पत्रकारांना दिले पण आधी मेळावा नंतर पत्रकार परिषद असा हुकमी एक्का व तुरुप निघाल्यामुळे पत्रकारांनाही
नमते घ्यावे लागले. कार्यकर्त्यांपेक्षाही काही पत्रकारांनी या मेळाव्याला गर्दी करून आपली राजकीय पक्षाची निष्ठा दाखवून दिलेली आहे. असे नाना शिंदे यांनी सांगितले. एकूणच बऱ्याच दिवसाने नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दरवाजा खुला झाल्याने आता तिसऱ्यांदा पक्ष प्रवेश करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना सातारा जिल्ह्यात सामाजिक व राजकीय काम करण्यासाठी जागा मिळाली. परंतु, दरवाजा उघडा राहणार का ? की बैठक मेळावा झाल्यानंतर दरवाजा बंद होणार हे मात्र पुढील काळात सांगू शकेल हे मात्र खरे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button