सातारा:-महाराष्ट्रातील पहिले सूर्यनमस्कार शिल्प साताऱ्यात.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
महाराष्ट्रातील पहिले सूर्यनमस्कार शिल्प साताऱ्यात.
सातारा दिनांक छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे सध्या छत्रपती शिवरायांनी हाती घेतलेली वाघ नखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात दाखल झालेले आहेत. ही अभिमानासद बाब ठरली आहे. तर दुसऱ्या बाजूला सातारा नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले सूर्यनमस्कार शिल्प साताऱ्यात उभारण्यात आलेले आहे.
सातारा कोरेगाव रस्त्यावरील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या खाली सध्या हे सूर्यनमस्कार शिल्प सातारकर व पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. या ठिकाणी सूर्यनमस्काराचे सर्व गुण व पद्धत या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. हे सोनेरी रंगाचे शिल्प भारत देशातील सुवर्णकाळ नजरेसमोर आणून ठेवत आहे. यामुळे हे शिल्प आता पर्यटकांचे केंद्र बनलेले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, विजय ओव्हाळ तसेच वंचित बहुजन आघाडीचे सातारा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे व उपाध्यक्ष अमोल गंगावणे कुमार ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतेच या सूर्यनमस्कार शिल्पाची पाहणी करण्यात आली.
सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे.
शरीर तंदुरूस्त ठेवण्याचा मार्ग
सूर्यनमस्काराचे नाना फायदे आहेत. यामुळे शरीर सदृढ राहण्यास मदत होतेच शिवाय वजनही नियंत्रणात राहते. सूर्यनमस्कार केल्याने लवचिकता, ताकद आणि एकूणच फिटनेस सुधारण्यास मदत करते. नियमित सूर्यनमस्कार केल्यास शारीरिक आणि मानसिक संतुलन वाढण्यास मदत होते. अशी माहिती सूर्यनमस्कार नियमितपणे करणारे अभ्यासक यांनी दिली आहे.
भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात. उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा। पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते असे सुभाषित याबाबत प्रसिद्ध असून सूर्यनमस्कार म्हणजे आपली शरीर संपदा चांगली ठेवणे यासाठी एक प्रयोगशाळा आहे. असे मत रिपब्लिकन पक्षाचे कवाडे गटाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी व्यक्त केले आहे. या ठिकाणी तरुण पिढी सूर्यनमस्कार घालून व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे.
—————————————-
फोटो -सातारा महामार्गावरील पुलाखाली सूर्यनमस्कार शिल्प व सूर्यनमस्कार मारताना पै .राजेंद्र ओव्हाळ (छाया- निनाद जगताप, सातारा)
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन