आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-साताऱ्याच्या चळवळीतील एका लढवय्या पॅंथर चा इतिहास…. प्राध्यापक प्राचार्य अरुण गाडे.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्याच्या चळवळीतील एका लढवय्या पॅंथर चा इतिहास…. प्राध्यापक प्राचार्य अरुण गाडे.

 

(लेखक) अनमोल कांबळे

तो श्वास होता ते ध्येय होतं! आणि ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नवी क्रांती होती! ती क्रांती केवळ देशाला नाही तर जगाला सांगून गेली की चळवळीतून आणि संघर्षातून क्रांती घडते आणि दाखवून देते की या जगात सगळ्यात मोठी ताकद ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या न्याय हक्काच्या आंदोलनाची ताकद आहे, त्याच संघर्षाच्या चटक्यातून लाट्या काट्या खात साताऱ्याच्या अनेक पॅंथरांनी त्याकाळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे यासाठी आंदोलने उभी केली त्या आंदोलनातील एक चमकणारा तारा म्हणजे प्राध्यापक प्राचार्य अरुण गाडे सर सरांचा आज सकाळचा स्टेटस वाचला आणि अंगावरती काटा आला. स्टेटस होता मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेबांचे नाव द्यावे यासाठी आम्ही पॅंथर्सनी अनेक वर्षे लढा दिला तो संघर्षमय लढा 14 जानेवारी 1994 ला यशस्वी झाला नामांतर झालं तेव्हा मी जेलमध्ये होतो. बाहेर माझे बांधव आनंद उत्सव साजरा करत होते अन, मी आणि माझे सोबती पॅंथर्स जेलमध्ये आनंद उत्सव साजरा करत होतो. नाचत होतो आणि आता उद्या एक नामांतरवादी म्हणून माझा साताऱ्यात सत्कार आहे, पणमी जाणार नाही कारण तो लढा माझ्या बापाच्या नावासाठी होता. आणि मी बापाच्या नावासाठी लढलो. मग सत्कार कशाला? करता क्रांतिकारी जय भिम, हे एक स्टेटस नव्हतं हा एक विचार होता क्रांती देणारी प्रेरणा होती नोकरीच्या आमिषा पोटी संघर्षाच्या चळवळीतून दूर पळणार्‍या कार्यकर्त्याला चपराक होती. आजच्या काळात संघर्ष करायचं म्हणलं तर डोळ्यासमोर भविष्याच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट चा फॉर्म दिसतो पण त्याकाळी ज्याच्यामुळे आम्हाला आज शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार मिळालेला आहे त्याचं नाव दिसत होतं तो श्वास होता ते ध्येय होतं तो विचार होता. परिणाम काय होतील याचा विचार करत बसलो असतो तर उध्वस्त झालो असतो. म्हणून आम्ही सर्वांनी क्रांती करायची ठरवली आणि केवळ एका राज्याला नाही देशाला नाही तर जगाला दिशा देण्याचे काम या क्रांतीच्या विजयाने केल…..

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरामध्ये शहीद झालेल्या सर्व पॅंथरांना विनम्र अभिवादन💐💐💐💐💐…

आणि लढ्यामध्ये शामिल असलेल्या सर्व क्रांतिकारांना क्रांतिकारी जय भिम पॅंथर जय भीम….

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button