कराड:-नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी साहेब याचे कराड शहरात जोरदार स्वागत.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दिनांक 7/11/2022 रोजी नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक /अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी साहेब याचे कराड शहरात आगमन होताच राष्ट्रीय फेडरेशन नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गफ्फार भाई नदाफ यांनी त्याच्या सहकार्या सोबत कासमभाई मुलाणी याचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले त्यानंतर महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या बाबत देशाचे अध्यक्ष आदरणीय बाबा कांबळे व देशाचे उपादयक्ष नरेंद्र भाई गायकवाड याच्या नेत्रत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना जागृत करण्यात येऊन त्याचे न्याय हक्क व प्रमुख मागण्या मिळवून देण्याकरिता चलो आजाद मैदान ना भूतो ना भविषते आशा प्रकारचे आंदोलन उभे करावेच लागेल आतापर्यंत वारसा हक्काने मिळविलेल्या व आपली दुकाने चालवून महाराष्ट्रात दलाल नेमून फंड जमा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व कल्याणकारी महामंडळास समांतर आर्थिक महामंडळ करणाऱ्या स्वघोषिताचा जाहीर निषेध करण्यात येऊन महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.