पुणे:-28 जून रोजी फुले एज्युकेशन तर्फे शीतल इंगळे आणि शिवराज पिल्ले यांचा 57 वा.अंतरजातीय सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा होणार !!!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-28 जून रोजी फुले एज्युकेशन तर्फे शीतल इंगळे आणि शिवराज पिल्ले यांचा 57 वा.अंतरजातीय सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा होणार !!!

पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्ष , व धर्मवीर संभाजी महाराज यांची 369 वी जयंती आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची 152 व्या जयंतीनिमित्त रविवार दि.28 जून 2026 रोजी स.11 वाजता राजयोग प्लाझा ,वडगांव बु.पुणे 68 येथे जेष्ठ समाजसेवक भिका दशरथ इंगळे यांची दारिका सत्यशोधिका शीतल इंगळे (घटस्पोटीत )BA, आणि कै.नटराज विरागू पिल्ले यांचे दारक सत्यशोधक शिवराज पिल्ले (घटस्पोटीत) 10 वी पास यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने 57 वा सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा मोफत संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडणार आहेत यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट दिली जाणार आहे. यावेळी वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र येण्यात येणार आहे.
आयोजक रघुनाथ ढोक म्हणाले की घटस्पोटीत ,विधवा महिलांचे पुनर्विवाह होणे गरजेचे असून त्यांना अपत्य असतील तरीदेखील अपत्यासह स्वीकारणारे वरांनी पुढे येऊन जीवनसाथी म्हणून स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. या आधुनिक काळात पालकांनी आणि नातेवाईकांनी अशा घटस्पोटीत ,विधवा महिलांना घरी ठेवण्यापेक्षा त्यांचा पुनर्विवाह करून सन्मानाने उर्वरित आयुष्य सुखमय जगण्यास त्यांना प्रवृत्त करावे. यासाठी फुले एज्युकेशन संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही मोफत रजिस्टर नोंदणी करून विवाह सन्मानाने लावण्यास तयार असून संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात व तेलगांना राज्यात देखील असे घटस्पोटीत ,विधवा ,बिजवर व प्रथम ,विकलांग विवाह सत्यशोधक पद्धतीने लावलेले आहेत.




